AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milk Termeric Face Pack: बदलत्या ऋतूमध्ये ‘या’ पद्धतीनं त्वचेची काळजी घ्या, पिंपल्स मुरूमांच्या समस्या होतील दूर…

Skincare Tips: सूर्यप्रकाशामुळे आणि हवामानातील थंडी वाढल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ लागतो. अशा परिस्थितीत, बदलत्या ऋतूमुळे केवळ आरोग्यावरच नाही तर त्याचा गंभीर परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येतो. बदलत्या हवामानात आरोग्यासोबतच त्वचेचीही विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत, चला जाणून घेऊया निरोगी त्वचेसाठी घरगुती फेस मास्क सांगणार आहोत.

Milk Termeric Face Pack: बदलत्या ऋतूमध्ये 'या' पद्धतीनं त्वचेची काळजी घ्या, पिंपल्स मुरूमांच्या समस्या होतील दूर...
| Edited By: | Updated on: Feb 15, 2025 | 5:03 PM
Share

आपल्या सर्वांनाच सुंदर दिसायचं असतं. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या ऋतूचा परिणाम तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या त्वचेवर देखील दिसून येतो. वातावरणातील बदलामुळे आणि आद्रतेमुळे चेहऱ्याचे भरपूर नुकसान होते. हिवाळ्यानंतर हवामानामध्ये अचानक बदल झाल्यामळे तुम्हाला त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. दुपारी दीर्घकाळ घराबाहेर राहिल्यामुळे तुम्हाला सनबर्न सारख्या समस्या उद्भवतात. त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर ती करडी आणि निस्तेज दिसू लागते.

आजकाल त्वचेची योग्य काळजी नाही घेतल्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि खराब दिसू लागते. बदलत्या ऋतूमधये त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय केले जातात. चमकदार त्वचेसाठी तुम्ही पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च करतात. परंतु, मार्केटमधील फेशियलमुळे आणि त्यामधील रसायनिक पदार्थांमुळे तुमच्या त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. निरोगी आणि निस्तेज त्वचेसाठी तुम्ही त्यावर दुध आणि हळदीचा फेस पॅक वापरू शकता. या मास्कचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे होतात आणि चेहरा अनखी चमकदार बनतो.

दूध आणि हळदीचा फेस पॅक कसा बनवायचा?

1) फेस मास्क बनवण्यासाठी प्रथम हळदीमध्ये कच्चे दूध घाला.

2) आता त्यात मध मिक्स करूण चांगले फेटून पेस्ट तयार करा.

3) तुमचा कच्चा दूध आणि हळदीचा फेस मास्क तयार आहे.

4) तयार फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा जेणेकरून संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना ऍलर्जी होणार नाही.

5) जर त्वचा लाल झाली, पुरळ उठली किंवा खाज सुटली तर हा मास्क वापरू नका.

6) या फेस पॅकच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

दूध आणि हळदीचा फेस पॅक लावण्याचे फायदे

दुधाचा चेहऱ्यावर वापर केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. कच्च्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे अ, ड, ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे त्वचेच्या मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानास प्रतिबंध करण्यास मदत होते. कच्च्या दुधामधील लॅक्टिक अॅसिड तुमच्या चेहऱ्यावरील मृत पेशी कमी होण्यास मदत होते. या फेस पॅकचा चेहऱ्यावर वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते. हळदीमध्ये अँटिबॅक्टिरियल आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे हायपर पिग्मेंटेशनच्या समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावर हळद आणि दूधाचा फेस पॅक वापरल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत होते. हळदीमधील औषधी गुणधर्म तुमच्या त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. परंतु तुमची त्वचा जर संवेदनशिल असेल तर या पॅकचा वापर जास्त प्रमाणात करू नये.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.