AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वर्क फ्रॉम होम’ ठरतेय महिलांना डोकेदुखी? मुलांची लुडबुड, घरकाम आणि ऑफीसचे काम; कसा साधनार ताळमेळ.. ‘या’ टिप्स करा फॉलो !

वर्क फ्रॉम होमच्या अडचणी ज्यांच्या घरात लहान मुले आहेत, त्यांना घरून काम करणे कठीण होऊन बसतं. याच अडणीसाठी आम्ही आपल्याला काही टिप्स बद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करुन चांगले काम करून, सोबतच कुटुंबासाठी वेळही देऊ शकता.

‘वर्क फ्रॉम होम’ ठरतेय महिलांना डोकेदुखी? मुलांची लुडबुड, घरकाम आणि ऑफीसचे काम; कसा साधनार ताळमेळ.. ‘या’ टिप्स करा फॉलो !
| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 4:16 PM
Share

कोरोना या जागतीक महामारीने, जवळपास सर्वांचीच जीवनशैली आणि दिनचर्या खूप बदलली (The routine changed a lot) आहे. त्यात नोकरी करणारयांवर याचा सर्वाधीक प्रभाव जाणवतो. कोविड-19 मुळे वर्क फ्रॉम होम ची पद्धत सर्वसामान्यांमध्ये चांगलीच रुढ झाली आहे. महामारीकाळात सर्वांनाच घरातून काम करावे लागत होते, आता मात्र, जवळपास सर्वच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जावे लागत आहे. परंतू, अद्यापही अशी काही कार्यालये आहेत जिथे कर्मचार्यांच्या सोयी किंवा इतर कारणांमुळे वर्कफ्रॉम होम (Work from Home) सुरूच आहे. जस वर्क फ्रॉम होम कल्चर रुढ झाल्याचा अनेकांना फायदा झाला. तसचं, त्याचा तोटाही काहींना सहन करावा लागतोय. लोकांची शारीरिक हालचाली कमी झाल्या आणि प्रत्यक्ष परस्पर संवादही कमी झाला आहे. महिलांसाठी तर घरून ऑफीसचे काम करणे हे एक दिव्यच आहे. ज्यांची लहान मुले आहेत त्यांना तर, कार्यालयीन कामावर लक्ष केंद्रीत करणे (Focusing on work) कठीन झाले आहे.

दिवसभराच्या कामाचे नियोजन करा

कुटूंबात जर मूलं लहान असतील, तर त्याला समजावून सांगणे थोडे कठीण होऊन जाते. अशा परिस्थितीत तुम्हाला संयम ठेवुन परिस्थिती हाताळावी लागते. जर तुमचे मूल घरून काम करतांना डीस्टर्ब करत असेल, तर जेव्हा ते झोपत असेल तेव्हा तुमच्या कामाचे नियोजन करा. म्हणजे, जर तुम्ही सकाळी लवकर उठून तुमचे महत्त्वाचे काम उरकवुन घेत असाल, तर ही पद्धत तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.

घरातील कामे विभागून घ्या

घरून काम करतानाही कामाचे दडपण असते. त्यात जर घरात मुले असतील तर, झालाच बट्ट्याबोळं! परिस्थिती अधिक तणावाची होऊ शकते. जर तुमचा पार्टनर तुमच्या कामात तुमची मदत करू शकत असेल तर त्याला तुमच्या घरातल्या कामात सहभागी करुन घ्या. तुम्ही दोघांनी मिळून घरकाम वाटून घेतले तर ते लवकर पूर्ण होईल आणि कार्यालयीन कामाला अधिक वेळ देता येईल. त्यामुळे दोघांचाही ताणाव कमी होईल.

खोटे बोलू नका

बहुतांश वेळा असे घडते की, पालक कार्यालयीन कामात व्यस्त असतात आणि याच वेळी मुलांना त्यांच्या सेाबत खेळण्याची, वेळ घालवण्याची ईच्छा असते. अशा वेळी बहुतेक पालक या मुलांशी खोटे बोलून टाळण्याचा प्रयत्न करतात. ही पद्धत काही दिवस चालेल, पण नेहमी नेहमी खेाटं बोलणे परवडणारे नाही. एक काळ असा येईल की, तुमच्या खोटं बोलण्याच्या सवयीमुळे मूलं चिडचिडे होऊ शकतात.

मुलांना कामाचे महत्व पटवून द्या

मुलांसोबत खोटे बोलण्यापेक्षा त्याला तुमच्या कामाची पद्धती आणि परिस्थिती समजावुन सांगा. तुमचे काम किती महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला हवे असल्यास मुलासमोर त्याच्या अभ्यासाचे उदाहरण ठेवा. मुलांना सांगा की जर त्याने त्याचे शाळेचे होमवर्क केला नाही तर त्याला शिक्षकांकडून फटकारले जाऊ शकते. त्याचप्रमाणे कार्यालयीन कामे न केल्यास त्यांच्या पालकांनाही तशीच शिक्षा होते, आणि कोणताही पाल्य आपल्या पप्पाला किंवा मम्मीला आपल्या मुळे शिक्षा होईल असे निश्चीतच वागणार नाही. कदाचित ही पद्धत अवलंबल्यास, मुलांना त्याची जाणीव निर्माण होईल.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.