AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा!

उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे. हे सहसा 35 ते 40 वर्षांच्या वयानंतर होते. उच्च रक्तदाबाचे कारण ताण आणि खराब जीवनशैली आहे. हृदय शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त पोहोचवण्याचे काम करते. जर हा दबाव वाढला तर उच्च रक्तदाब होतो आणि जर दबाव कमी झाला तर कमी रक्तदाबाची तक्रार निर्माण होते.

Health Tips : उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी 'या' टिप्स नक्की फाॅलो करा!
उच्च रक्तदाब
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 3:25 PM
Share

मुंबई : उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे. हे सहसा 35 ते 40 वर्षांनंतर होते. उच्च रक्तदाबाचे कारण ताण आणि खराब जीवनशैली आहे. हृदय शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त पोहोचवण्याचे काम करते. जर हा दबाव वाढला तर उच्च रक्तदाब होतो आणि जर दबाव कमी झाला तर कमी रक्तदाबाची तक्रार निर्माण होते. मात्र, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीने हा आजार नियंत्रणात ठेवता येतो.

1. मीठ कमी खा

अन्नासोबत जास्त मीठ खाल्ल्याने तुमच्या शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे उच्च रक्तदाब, स्ट्रोकसह इतर गंभीर हृदयरोग होऊ शकतात. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही जेवणात मिठाचे सेवन कमी करा. याशिवाय प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी ताजी फळे आपल्या आहारात घ्यावीत.

2. कॅफीनचे प्रमाण कमी करा

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर कॅफिनचे सेवन कमी करा. यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो. आपल्यापैकी बरेचजण ऑफिसमध्ये काम करताना कॉफी आणि चहा पितात. यामुळे शरीरात चपळता येते. कॉफी प्यायल्यानंतर पूर्ण उर्जा जाणवते. तज्ञांच्या मते, दिवसातून एक ते दोन कप कॉफी पिणे फायदेशीर आहे.

3. भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात. अभ्यासानुसार, त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. जर तुम्हाला कमी रक्तदाब असेल तर भोपळ्याच्या बिया आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अश्वगंधा

अश्वगंधा ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. आपण आपल्या संध्याकाळच्या चहामध्ये ते मिक्स करून आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. अभ्यासानुसार, अश्वगंधा रक्तदाब नियंत्रित करते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते.

लसूण

लसूण रक्तदाब कमी करण्यास मदत करते. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. तुम्ही दररोज सकाळी लसणाचे सेवन करू शकता. याचे सेवन करण्याचे इतर अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.

4. व्यायाम करा

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा. व्यायामामुळे केवळ उच्च रक्तदाब नियंत्रित होत नाही तर हे हृदयासाठी देखील खूप फायदेशीर आहे. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून 30 ते 45 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. याशिवाय ताण नियंत्रणात ठेवावा. तणावामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते. ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

( Follow these 6 tips to control high blood pressure)

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!