Winter Diseases : हंगामी आजारांपासून दूर राहण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा! 

हिवाळ्याच्या हंगामात सर्दी होणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु त्यामुळे इतर अनेक संसर्ग होण्याचा धोकाही असतो. आणि वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमध्ये हानिकारक विषारी पदार्थ हवेत सर्वत्र पसरतात. या काळात स्वतःची काळजी घेणे अधिक महत्वाचे आहे.

Winter Diseases : हंगामी आजारांपासून दूर राहण्यासाठी 'या' खास टिप्स फाॅलो करा! 
हंगामी आजार

मुंबई : हिवाळ्याच्या हंगामात सर्दी होणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु त्यामुळे इतर अनेक संसर्ग होण्याचा धोकाही असतो. आणि वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमध्ये हानिकारक विषारी पदार्थ हवेत सर्वत्र पसरतात. या काळात स्वतःची काळजी घेणे अधिक महत्वाचे आहे. हिवाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू थंड असतात. त्यामुळे संक्रमण आणि आरोग्याच्या समस्या वाढतात. हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी काही खास टिप्स फाॅलो करा.

-पोटातील फ्लू, सर्दी आणि संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चांगली स्वच्छता करणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. हे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमणाचा प्रसार रोखण्यात देखील मदत करते.

-या हंगामात दररोज योगा केल्याने निरोगी राहण्यास मदत होते. म्हणून दररोज सकाळी फिरून आल्यानंतर किमान वीस मिनिटे तरी योगा हा केला पाहिजे. योगा आपल्याला हंगामी संक्रमनापासून दूर ठेवण्यास मदत करतो.

-तुळसमध्ये चांगले अँटीसेप्टिक आणि विषाणूविरोधी गुणधर्म आहेत आणि सामान्य सर्दी आणि फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्ग दूर करण्यासाठी तुळस मदत करते. आपण चहामध्ये तुळशीची पाने मिक्स करून पिऊ शकता. ज्यामुळे सर्दीची समस्या दूर होण्यास मदत होते.

व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले अन्न या हंगामात आवश्यक असते. कारण ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. या पोषक तत्वांसह फळे आणि भाज्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, काळी मिरी, हिरव्या पालेभाज्यांचा आपला आहारामध्ये समावेश करा.

-जर, शरीर आतून कमकुवत असेल, तर खूप थंडी वाजण्याची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत मनुका आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आपण मनुका सहजपणे एका खिशात ठेवू शकता आणि आपल्यासमवेत घेऊन जाऊन, थोड्या-थोड्या वेळाने त्या खाऊ शकता. मनुक्यात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर या घटकांचे मुबलक प्रमाण असते. मनुक्याच्या नियमित सेवनाने शारीरिक दुर्बलता, अशक्तपणासारख्या समस्या कमी होतात.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!


Published On - 12:30 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI