‘गर्भधारणा’ थांबवण्यासाठी अवलंब करा ही ‘अनोखी’ पद्धत; जाणून घ्या, काय आहेत ‘या’ पद्धतीचे फायदे आणि तोटे!

ज्या स्त्रिया गरोदर राहू इच्छित नाहीत त्या अनेकदा अनेक पद्धतींचा अवलंब करतात. ‘गर्भधारणा’ टाळण्यासाठी ‘गर्भनिरोधक गोळ्यांचे’ अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. या गोळ्या संभोगानंतर ४८ किंवा ७२ तासांच्या आत घेतल्या जाऊ शकतात.

‘गर्भधारणा’ थांबवण्यासाठी अवलंब करा ही ‘अनोखी’ पद्धत; जाणून घ्या, काय आहेत ‘या’ पद्धतीचे फायदे आणि तोटे!
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 8:31 PM

मुंबईः आत्तापर्यंत गर्भनिरोधकांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व गोळ्या पाण्यासोबत खाल्ल्या जातात हे सर्वांना माहित असेल. पण एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे की, तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या (Birth control pills) पाण्याशिवायही खाऊ शकतात. या गोळ्यांना चघळावे लागते. चघळलेल्या गर्भनिरोधक गोळ्या देखील इतर गर्भनिरोधकाप्रमाणेच कार्य करतात. यात वेगळे काही नसते. विशेष म्हणजे याचे सेवन करताना तुम्हाला ते पाण्यासोबत खाण्याची गरज नाही, तुम्ही ते चावून खाऊ शकता. चघळलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन असे दोन हार्मोन्स असतात.

हे दोन्ही हार्मोन ओव्हुलेशन रोखण्यासाठी आणि गर्भधारणेचा धोका (Risk of pregnancy) कमी करण्यासाठी कार्य करतात. परंतु, लक्षात ठेवा की, तुम्ही नेहमी वापरत असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या चघळू शकत नाही किंवा क्रश करू शकत नाही. या गर्भनिरोधक गोळ्या अशा प्रकारे तयार केल्या आहेत की तुम्हाला त्या पाण्यासोबतच खाव्या लागतात. या गोळ्या चघळल्याने (Chewing pills) किंवा चिरडल्याने त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो.

चघळण्यायोग्य गोळीचा फायदा

चघळण्यायोग्य गर्भनिरोधक गोळ्यांसाठी तुम्हाला पाण्याची गरज नाही. त्यामुळे ती इतर गर्भनिरोधक गोळ्यांपेक्षा खूपच वेगळी आहे. या गोळ्या अशा प्रकारे तयार केल्या आहेत की त्या चघळून किंवा चुरून खाल्ल्या जाऊ शकतात. चघळण्यायोग्य गोळ्या अशा स्त्रियांसाठी डिझाइन केल्या आहेत ज्यांना ते पाण्याने गिळणे आवडत नाही. या गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिनच्या उपस्थितीमुळे, ते अंडाशयात रोपण होण्यापासून रोखतात. तुम्ही काही गर्भनिरोधक गोळ्या चघळू शकता किंवा पाण्याने दोन्ही प्रकारे खाऊ शकता. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला ते खाण्यात ज्या प्रकारे आराम वाटेल त्या पद्धतीने तुम्ही त्या खाऊ शकता. चघळण्यायोग्य गर्भनिरोधक गोळ्यांचा एक फायदा म्हणजे त्या खाण्यास सोप्या असतात. ज्या महिलांना औषध गिळण्यास त्रास होतो त्यांच्यासाठी ही गोळी खूप फायदेशीर ठरू शकते.

दोन्ही गोळ्यांचे सारखेच फायदे

चघळण्यायोग्य गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इतर गर्भनिरोधक गोळ्यांसारख्याच गोष्टी असतात, त्यामुळे दोन्ही प्रकारच्या गोळ्यांचे समान फायदे आहेत. प्रत्येकजण चघळण्यायोग्य गर्भनिरोधक गोळ्या घेऊ शकत नाही. अनेक स्त्रियांना त्याची चव आवडत नाही. त्याच वेळी, काही महिला तक्रार करतात की हे औषध त्यांच्या दातांमध्ये अडकले आहे. अशा गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल, तर औषध नीट चघळणे आणि त्यानंतर एक ग्लास पाणी तोंडात फिरवून प्यावे.

चघळणाऱया गोळीमुळे रक्ताच्या गुठळ्या

नियमित गर्भनिरोधक गोळ्यांच्या तुलनेत चघळलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळेही अनेक समस्या उद्भवू शकतात. अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये, असे आढळून आले आहे की चघळण्यायोग्य गर्भनिरोधक गोळ्या रक्ताच्या गुठळ्या तयार करू शकतात. ज्या महिला धूम्रपान करतात आणि ज्यांचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांच्यामध्ये ही समस्या दिसून येते. याबाबत आजतक ने सविस्तर वृत्त प्रसारित केले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.