AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचेची खोलवर स्वच्छता करण्यापासून ते मुरुमांपर्यंत चारकोल आहे सर्वोत्तम, जाणून घ्या फायदे

आजकाल त्वचेच्या समस्या सामान्य झाल्या आहेत. जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल आणि अनेक समस्यांपासून त्वचेचं संरक्षण करायचे असेल, तर चारकोल मास्क वापरून पहा. चला या उपायाबद्दल जाणून घेऊयात.

त्वचेची खोलवर स्वच्छता करण्यापासून ते मुरुमांपर्यंत चारकोल आहे सर्वोत्तम, जाणून घ्या फायदे
| Edited By: | Updated on: Mar 29, 2026 | 4:44 PM
Share

प्रत्येक स्त्रीला चमकदार आणि मऊ त्वचा हवी असते , परंतु बदलते हवामान, धूळ, प्रदूषण आणि वाढत्या वयामुळे त्वचेचा रंग अनेकदा बदलतो. यामुळेच लोकं बाजारात उपलब्ध असलेली अनेक स्किन केअर प्रोडक्ट वापरतात. अशातच ॲक्टिव्हेटेड चारकोल हा केवळ सेलिब्रिटींमध्येच नव्हे, तर सामान्य लोकांमध्येही झपाट्याने एक लोकप्रिय पर्याय बनत आहे. ॲक्टिव्हेटेड चारकोल त्वचेतील घाण, धूळ आणि अतिरिक्त तेल शोषून घेतो . तसेच त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली विषारी द्रव्ये आणि प्रदूषके काढून टाकतो. जेव्हा त्वचेची छिद्रे स्वच्छ होतात, तेव्हा त्वचा त्वरित चमकदार आणि मऊ वाटते. चला तर मग चारकोल मास्क लावण्याचे कोण कोणते फायदे त्वचेला होतात ते जाणून घेऊयात.

चारकोल मास्क लावण्याचे फायदे-

1. ब्लॅकहेड्स

चारकोल मास्क लावल्यावून काढल्यावर किंवा धुवून टाकल्यावर सर्व ब्लॅकहेड्स निघून जातात. त्वचेची छिद्रे लहान दिसू लागतात आणि त्वचा अधिक उजळ व गुळगुळीत होते. खोलवर स्वच्छता करण्याव्यतिरिक्त, चारकोल त्वचेचा पोत सुधारतो.

2. पोर्स-

त्वचेवरील मोठी पोर्स ही अनेकदा एक मोठी समस्या असते. चारकोल त्वचेचे हे पोर्स स्वच्छ करण्यास आणि त्यांना कमी दिसण्यास मदत करते. यामुळे तुमच्या त्वचेचे स्वरूप सुधारते आणि तुमचा चेहरा ताजेतवाने दिसतो.

3. मुरुमे-

चारकोल त्वचेवर लावल्याने मुरुमे आणि पुरळ कमी होतात. कारण चारकोल तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकतो, जे मुरुमे आणि ब्लॅकहेड्सचे मुख्य कारण आहेत. चारकोलमध्ये जीवाणूनाशक गुणधर्म देखील आहेत, जे जीवाणूंना मारून मुरुमे कमी करण्यास मदत करतात.

4. तेलकट त्वचा

चारकोल तेलकट त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुमच्या त्वचेतून जास्त तेल बाहेर पडत असेल, तर चारकोल ते अतिरिक्त तेल शोषून घेतो आणि त्याचे संतुलन राखतो. यामुळे तेलकटपणा जाणवत नाही आणि मुरुमे येण्याची शक्यता कमी होते.

टीप: आठवड्यातून 2-3 वेळा चारकोल वापरल्याने तुमचा चेहरा टवटवीत आणि निरोगी दिसतो, परंतु तुमची त्वचा संवेदनशील असल्यास ते वापरण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.) —————————————————————— —————————————————————— ——————————————————————

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?