केस गळणं थांबेल, कोंड्याचीही समस्या होईल दूर फक्त खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ एक गोष्ट
केस गळणे, कोंडा आणि कोरडेपणा या केसांच्या समस्या आता सामान्य झाल्या आहेत. हिवाळ्यात या समस्या आणखी तीव्र होतात. तर आजच्या लेखात आपण खोबरेल तेलात कोणती गोष्ट मिक्स केल्याने या समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते त्याबद्दल जाणून घेऊयात...

आजकाल, बदलत्या जीवनशैली, ताणतणाव, अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी आणि केमिकलचा अति वापर करून तयार केलेले उत्पादन यामुळे केस गळणे आणि कोंडा होणे खूप सामान्य झाले आहे. लहान वयात केस गळणे, स्कॅल्पमध्ये कोरडेपणा व खाज सुटणे आणि कोंडा यासारख्या समस्या सतत सतावत असतात. तर यापासून सुटका मिळवण्यासाठी महागडे शाम्पू आणि उपचार करूनही योग्य परिणाम मिळत नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात असलेली ही एक गोष्टी, खोबरेल तेलात मिक्स करून आणि योग्यरित्या वापरल्यास, केसांशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो.
खोबरेल तेल शतकानुशतके केसांसाठी वापरले जात आहे. तसेच खोबरेल तेलात जर एक विशेष नैसर्गिक गोष्ट मिक्स करून वापरल्याने स्कॅल्पला पोषण मिळते. ज्यामुळे कोंडा कमी होऊ शकतो आणि केस गळतीची समस्या कमी होते. चला तर मग खोबरेल तेलात कोणती गोष्ट मिक्स केल्याने केसांच्या समस्यापासून आराम मिळू शकतो. त्याबद्दल जाणून घेऊयात.
हे पदार्थ खोबरेल तेलात मिक्स करा
खोबरेल तेलात तुम्ही जर कापूर मिक्स करून लावल्याने केसांच्या समस्येपासून आराम मिळतो. कारण केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. केस लांब, जाड आणि मजबूत बनवण्यास मदत होते. त्यात अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे खाज सुटणे, जळजळ होणे आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात. तसेच हे तेल लावल्याने रक्ताभिसरण देखील वाढवते, केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळतीवर लक्षणीय नियंत्रण ठेवते. तथापि हे तेल लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
अशा पद्धतीने बनवा हेअर ऑईल
केसांच्या बहुतेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावू शकता. हे केसांचे तेल बनवण्यासाठी, तुम्हाला 2.5 चमचे खोबरेल तेल लागेल, त्यात थोडे कापूर (1/4 चमचे किंवा 1 छोटी गोळी) पावडर मिक्स करा आणि तेल थोडं गरम करा. थंड झाल्यावर ते तुमच्या स्कॅल्पवर हलक्या हाताने मसाज करा. 30 ते 60 मिनिटे किंवा रात्रभर तसेच राहू द्या आणि नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.
खोबरेल तेला कांद्याचा रस मिक्स करून लावणे उत्तम
कांद्याचा रस खोबरेल तेलात मिक्स करून लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. कांद्याचा रस केसांसाठी वरदान मानले जातात. कांद्यामधील सल्फरचे प्रमाण कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ सुधारते. यामुळे स्कॅल्पचे संक्रमण आणि कोंडा कमी होण्यास देखील मदत होते.
खोबरेल तेलात किती चमचे कांद्याचा रस मिक्स करावा
2-3 चमचे खोबरेल तेल घ्या. त्यात 1-2 चमचे कांद्याचा रस मिक्स करा आणि स्कॅल्पला मसाज करा. कांद्याचा रस लावत असाल तर ते रात्रभर तसेच राहू देऊ नका. आंघोळीच्या एक तास आधी हे तेल लावा आणि नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवा
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
