AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024-2025 मध्ये काय झालं? निवडणुका पुढे का ढकलल्या? काय होतं प्लानिंग? राज ठाकरे करणार मोठा गौप्यस्फोट

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ४ वर्षे का रखडल्या? २०२४-२५ मध्ये नेमकं काय शिजत होतं? राज ठाकरे यांनी या मुलाखतीत महायुती सरकारच्या 'विनाशकारी' नियोजनावर भाष्य करत मोठ्या गौप्यस्फोटाचा इशारा दिला आहे.

2024-2025 मध्ये काय झालं? निवडणुका पुढे का ढकलल्या? काय होतं प्लानिंग? राज ठाकरे करणार मोठा गौप्यस्फोट
raj thackeray mahapalika election
| Updated on: Jan 08, 2026 | 9:57 AM
Share

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सध्या सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेची मुदत २०२२ मध्येच संपली होती. मात्र त्यानंतर तब्बल चार वर्षे उलटूनही निवडणुका का घेतल्या गेल्या नाहीत, यावरुन सध्या राजकारण तापले आहे. २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांच्या काळात निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यामागे सत्ताधाऱ्यांचे एक मोठे नियोजन होते, असा खळबळजनक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत गंभीर आरोप केले.

निवडणुका पुढे ढकलण्यामागचे खरे कारण काय?

खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीत अनेक आरोप केले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले. २०२२ मध्ये उद्धव ठाकरेंचे सरकार गेल्यानंतर महापालिका विसर्जित झाली, तरीही आज २०२६ उजाडले तरी निवडणुका का रखडल्या? या चार वर्षांत नेमकं काय शिजत होतं? असा सवाल राज ठाकरेंनी केला. हा विलंब केवळ तांत्रिक नव्हता, तर मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी आखलेला एक मोठा आराखडा होता. २०२४ ते २०२५ या काळात पडद्यामागे घडलेल्या घडामोडी आणि निवडणुका पुढे ढकलण्यामागचे खरे कारण काय होते, याचा सविस्तर गौप्यस्फोट आपण येत्या काही भाषणांतून करणार आहे, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले.

आपण काय घोडचुका करतोय हे कालांतराने समजेल

मराठी माणसाच्या सहीनेच मराठी माणसाचे डेथ वॉरंट काढले जात आहे असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. यावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. सध्या सत्तेत बसवलेली माणसे ही केवळ स्वाक्षरी करण्यासाठी आहेत. मुंबईला भाजपच्या माध्यमातून अदानींच्या घशात घालण्याचे प्रयत्न सुरू असून, आपल्याच मराठी लोकांना आपण काय घोडचुका करतोय हे कालांतराने समजेल, असा इशाराही राज ठाकरेंनी केला.

मुंबईची गरज आणि इथल्या जगण्याचा संघर्ष वेगळा

राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेवर प्रहार केला. त्यांनी स्वित्झर्लंडचे उदाहरण देत सांगितले की, एखाद्या शहरात जन्माला आल्याशिवाय तिथल्या नस ना नस समजत नाही. बाहेरून येऊन जेव्हा एखादा मंत्री मुंबई पाहतो, तेव्हा त्याला येथील रस्ते, पाणी आणि वीज पाहून वाटते की इथे काहीच समस्या नाहीत. कारण तो इथल्या परिस्थितीची तुलना त्याच्या भागातील भीषण लोडशेडिंग आणि कच्च्या रस्त्यांशी करतो. पण मुंबईची गरज आणि इथल्या जगण्याचा संघर्ष वेगळा आहे, जो या बाहेरच्या लोकांना कधीच कळणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण...
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण....
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम.
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल.
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं.