यूरिन इन्फेक्शन बनू शकते अनेक आजारांचे माहेरघर, या सवयी आताच दूर करा !

Urinary Tract Infection: सर्वसाधारणपणे अनेक महिला अशा प्रकारच्या चुका करतात त्यामुळे त्यांना युरिन इन्फेक्शन होऊ शकते आणि या समस्या पुढे युरिन इन्फेक्शन मागील एक कारण सुद्धा बनू शकते. अनेक महिलांना याबद्दल माहिती सुद्धा नसते त्या कोणत्या प्रकारच्या चुका करत आहे, चला तर मग जाणून घेऊया युरिन इन्फेक्शन बद्दल महत्त्वाच्या गोष्टी.

यूरिन इन्फेक्शन बनू शकते अनेक आजारांचे माहेरघर, या सवयी आताच दूर करा !
Urine
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Feb 09, 2022 | 12:13 AM

यूरीन इन्फेक्शन सारख्या समस्या अनेकदा महिलांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते. याला यूरिन इन्फेक्शन (Urine Infection) शिवाय यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन  (Urinary Tract Infection) असे देखील म्हटले जाते जे आपल्या मूत्रमार्गाला प्रभावित करते. तज्ञ मंडळी यांच्या मते यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे बॅक्टेरिया आणि संक्रमणाचे कारण ठरते. जर या समस्येचे योग्य वेळी उपचार केले गेले नाही तर भविष्यात ही समस्या गंभीर आजार बनू शकतो.अशा प्रकारचे इन्फेक्शन झाल्यास जळण होणे, पोटाच्या खालच्या भागांमध्ये वेदना होणे, खाज येणे (itching) आणि पिवळसर रंगाची लघवी होणे, गर्भवती महिलांना इन्फेक्शन झाले असल्यास अशा वेळी विशेष प्रकारची काळजी घेण्याचा सल्ला सुद्धा डॉक्टर देत असतात. जर गर्भवती महिलांना अशा प्रकारची समस्या उद्भवली तर अजिबात या समस्येकडे दुर्लक्ष करू नका त्वरित डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार आवश्यक करायला पाहिजे जेणेकरून होणाऱ्या बाळावर त्याचा कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी देखील घ्यायला हवी.

सर्वसाधारणपणे अनेक महिला अशा प्रकारच्या चुका करतात.या चुका युरिन इन्फेक्शनचे महत्त्वाचे कारण बनून जाते.अधिक व महिलांना या बद्दलची माहिती सुद्धा नसते की आपण कोणते एखादी चूक करत आहोत ,अशावेळी युरिन इन्फेक्शनची समस्या बहुतेक वेळा वाढून जाते चला तर मग जाणून घेऊया अशाच काही चुकांबद्दल ज्या महिलांनी प्रामुख्याने टाळायला हव्यात.

कमी पाणी पिणे

निरोगी आरोग्यासाठी डॉक्टर मंडळी आपल्याला जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देत असतात परंतु आपल्यापैकी अनेकांना कमी पाणी पिण्याची सवय असते.जर ही सवय तुम्हाला सुद्धा असेल तर आत्ताच ही सवय बंद करा आणि नियमितपणे दिवसभरातून जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावून घ्या. जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी प्यायला तर तुम्हाला युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि म्हणूनच शरीरामध्ये पाण्याची कमतरता राहिल्यास आपल्या मूत्राशयवर सुद्धा विपरीत परिणाम होताना दिसून येतो.

कपडे न बदलणे

असे सुद्धा अनेकदा घडते की ,अनेकजण आपल्या अंडरगारमेंट ना नियमितपणे बदलत नाही.ही चूक भविष्यात घातक ठरू शकते. तज्ज्ञ मंडळींच्या मते ही चूक युरिन इन्फेक्शनचे कारण बनू शकते.खरेतर यामुळे बॅक्टेरियांचे प्रमाण वाढते, जे भविष्यात युरिन इन्फेक्शन निर्माण करू शकतात म्हणूनच अनेकदा सल्ला दिला जातो की आपण जे काही अंडरगारमेंट्स वापरत असतो ते बदलायला हवेत.

लघवी थांबवणे

अनेकदा एखाद्या मजबुरीमुळे किंवा जर आपण बाहेर प्रवास करत असेल तर अशा वेळी आपण आपली लघवी थांबवून ठेवतो परंतु कधीच जास्त वेळ लघवी रोखून ठेवू नका असे केल्याने महिला आणि पुरुष या दोघांना भविष्यात धोका उद्भवू शकतो. असे म्हटले जाते की, जर एखादी महिला आळसपणा मुळे वारंवार लघवी थांबत असेल तर ही समस्या भविष्यात युरिन इन्फेक्शनचे महत्त्वाचे कारण ठरू शकते आणि त्या महिलेला भविष्यात युरिन इन्फेक्शन होऊ शकते.

पब्लिक टॉयलेट

सार्वजनिक शौचालयचे वापर करणे हे सुद्धा इन्फेक्शन्स एक कारण ठरू शकते. अनेकदा लोक सार्वजनिक शौचालयचा वापर केल्यानंतर तिथे स्वच्छता ठेवत नाही आणि म्हणूनच जर तुम्ही सुद्धा वारंवार सार्वजनिक शौचालयांचा वापर करत असेल तर भविष्यात तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सार्वजनिक शौचालय मध्ये जाऊन आल्यावर शरीराची स्वच्छता करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

सिगारेट सोडल्यानंतर कसे वाटते ? शरीरात जाणवतात नेमके कोणते जाणवतात बदल?

कच्चे दूध पिण्याचे हे धोके माहिती आहेत काय? वेळीच सावध व्हा…

अनवाणी चालण्याचे फायदे ऐकून थक्क व्हाल, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक चमत्कारी बदल

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें