AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Olive Oil Use: ऑलिव्ह ऑईल खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत….

Olive Oil Side Effect: तुमच्या दैनंदिन आहारात ऑलिव्ह ऑइलचा समावेश करण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु कोणत्याही पदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच तुम्ही जर जास्त प्रमाणात ऑलिव्ह ऑईलचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया काय आहेत ऑलिव्ह ऑईल खाण्याचे तोटे.

Olive Oil Use: ऑलिव्ह ऑईल खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत....
| Edited By: | Updated on: Feb 16, 2025 | 4:20 PM
Share

निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी योग्य आणि पोषक आहाराते सेवन करणे खूप महत्वाचे आहे. जर तुमचा आहार चांगला असेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतो. परंतु जर तुमच्या आहोरामध्ये पोषक तत्वंची कमतरता असेल तर त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. आहारात निरोगी गोष्टींचा समावेश करणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच त्या गोष्टी निरोगी पद्धतीने शिजवणे देखील खूप महत्वाचे आहे. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. व्यसत जीवनशैलीमध्ये जेवणाची वेळ बदलत राहाते. जास्त लेट जेवल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. लेट जेवल्यामुळे तुम्हाला पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

आरोग्य तज्ञ रोजच्या स्वयंपाकात ऑलिव्ह ऑइलचा समावेश करण्याचा सल्ला देतात. कारण ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यालग अनेक फायदे मिळतात, ऑलिव्ह ऑईलमध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी कोलेस्ट्रॉल असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरामध्ये हेल्दी कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू लागतो. याशिवाय ऑलिव्ह ऑईलचा तुमच्या आहारामध्ये वापर केल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहाण्यास मदत होते.

मसाज केल्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते

ऑलिव्ह ऑईलचा तुमच्या आहारामध्ये समावेश केल्यामुळे तुमच्या पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करते. ऑलिव्ह ऑईलमुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तुम्हाला जर लठ्ठपणाच्या समस्या असतील तर तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा आहारामध्ये समावेश करू शकता. ऑलिव्ह ऑईलमुळे तुमचं वजन कमी होतं आणि वजन नियंत्रित होण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑईल फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. ऑलिव्ह ऑईल तुमच्या त्वचेवर मसाज केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसून येते. ऑलिव्ह ऑईलने चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे पिंपल्स आणि पिग्मेंटेशनच्या समस्या दूर होण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑईल तुमच्या केसांसाठी देखील फायदेशीर ठरते. केसांवर ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्यामुळे केस मजबूत आणि जाड होण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑईलचा केसांवर वापर केल्यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते आणि केसांमधील फ्रिझीनेस दूर होण्यास मदत होते.

वजन वाढू शकते

ऑलिव्ह ऑइलच्या फायद्यांची जाणीव झाल्यानंतर, जगभरातील लोक त्यांच्या आहारात ते समाविष्ट करण्यास पसंती देत ​​आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की जास्त प्रमाणात ऑलिव्ह ऑइल सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. तर मग जाणून घेऊया ऑलिव्ह ऑइलचे तोटे. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचा स्मोक पॉइंट कमी असतो आणि भारतीय स्वयंपाक करताना जास्त उष्णता असल्याने चव जाऊ शकते. तसेच, तुमच्या ऑलिव्ह ऑईल शरीरात विषारी पदार्थ आणि मुक्त रॅडिकल्स तयार करू शकते ज्यामुळे आपल्या शरीरात जळजळ होऊ शकते. ऑलिव्ह ऑइलमध्ये कॅलरीज जास्त असतात. एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये सुमारे 120 कॅलरीज असतात. जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते. ऑलिव्ह ऑइलचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाबावरही परिणाम होतो. यामुळे तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो. ऑलिव्ह ऑइलच्या जास्त सेवनाचा एक मोठा तोटा म्हणजे ते खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढवते. खरंतर, ऑलिव्ह ऑइलमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात, ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल किंवा एलडीएलची पातळी वाढू शकते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.