रात्री झोपताना घाम येतो? वेळीच सावध व्हा, असू शकतो गंभीर आजारांचा धोका

रात्री झोपताना घाम येत असल्यास शरीर तुम्हाला काहीतरी गंभीर आजाराचा इशारा देत असते. त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको, वेळीच लक्षणे ओळखून तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. झोपताना घाम येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका

रात्री झोपताना घाम येतो? वेळीच सावध व्हा, असू शकतो गंभीर आजारांचा धोका
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 11:10 AM

मुंबई : रात्री झोपताना (sleeping at night) घाम (sweat) येत असेल तर हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते. अनेकदा औषध घेतलं तरीही रात्री झोपताना घाम येतो. बहुतेक लोकांना झोपताना घाम येतो, परंतु बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करीत असतात. रात्री झोपताना येणारा घाम हा अनेक रोगांचे लक्षण असू शकतो. त्यामुळे या लक्षणांना ओळखून वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरत असते. नाहीतर हे पुढे गंभीर (serious) आजारालाही आमंत्रण देउ शकते. एका अभ्यासानुसार, या स्थितीला इडिओपॅथिक हायपरहाइड्रोसिस असेही म्हणतात. घाम का येतो? याबाबत अनेक लोक आपआपले अंदाज बांधत असतात. जास्त तिखट खाल्ले, गरम-गरम जेवण केले, झोपताना बाहेरुन शतपावली करुन आले, आदी विविध कारणांमुळे आपल्याला घाम घेत असल्याचा अंदाज बांधला जात असतो. परंतु हे चुकीचे आहे. आपल्या पद्धतीने अंदाज न बांधता आपल्याला जाणवत असलेल्या लक्षणांबाबत त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक असते.

क्षयरोगामुळे घाम

रात्री झोपताना घाम येण्यामागे क्षयरोग हेदेखील एक कारण असू शकते. तुम्हाला क्षयरोग झाला असला तरीही तुम्हाला रात्री घाम येतो. या आजाराचा सर्वाधिक फटका फुफ्फुसांना बसतो. अशा स्थितीत रुग्णांना झोपताना घाम येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना विशेष काळजी घ्यावी लागते. क्षयरोगामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. त्यामुळे याचा परिणाम आपल्या शरीरावर पडत असतो. शिवाय वजन कमी होत असल्याने आपल्याला विविध आजारांचा धोको संभवतो.

कॅन्सरचा धोका

कॅन्सर झाला असला तरी रात्री झोपताना घाम येतो. एका निरीक्षणानुसार, विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्ये, रुग्णाला रात्री घाम येतो. जेव्हा शरीर कर्करोगाशी लढा देत असते, तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती संसर्गासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे रात्री ताप आणि घाम येतो. परंतु हे कारण असेलच असे नाही, त्यामुळे अशी लक्षण दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेउन त्यावरील उपचार घ्यावेत.

गॅसच्या समस्येमुळेही घाम

रात्री घाम येत असेल तर केवळ गंभीर आजारांमुळेच नाही तर, यासोबतच गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डरमुळे रात्री झोपताना घामही येतो. खरं तर, जेवणाच्या नलीकेमध्ये बनवलेले असिड झोपताना पोटात जमा होते. यामुळे छातीत जळजळ होते आणि झोपतानाही घाम येत राहतो, त्यामुळे नेहमी जेवण केल्यानंतर लगेचच झोपणे टाळावे, काही काळासाठी चालण्याचा व्यायाम करुन मगच झोपावे.

संबंधित बातम्या :

मेंदूच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको… मोजावी लागेल मोठी किंमत

गॅस गिझर वापरताना हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो, या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका!

रिकाम्या पोटी ग्रीन टी पिताय? मोठ्या नुकसानीचा सामना कारावा लागेल

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.