AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women Health : तरूणपणी आहारामध्ये रोज या गोष्टी खाव्यात, वयाच्या 30 शी नंतरही राहताल फिट!

महिला फिटनेसबाबत जास्तच जागरूक असतात. त्यांना त्यांच्या सौंदर्यासोबतच फिटनेसही महत्त्वाचा असतो. त्या फिट राहण्यासाठी काहीही करायला तयार असतात. तसंच 30 वर्षांवरील महिला नेहमीच त्यांच्या फिटनेसबाबत काळजी घेताना दिसतात.

Women Health : तरूणपणी आहारामध्ये रोज या गोष्टी खाव्यात, वयाच्या 30 शी नंतरही राहताल फिट!
Image Credit source: Freepik
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 25, 2023 | 8:46 PM
Share

मुंबई : आजकाल प्रत्येकाला वाटत असतं की, आपण फिट आणि हेल्दी राहावं. यासाठी प्रत्येकजण काही ना काही करत असतंच. मग यामध्ये डाएट असो व्यायाम असो किंवा जिम लावणे असे अनेक उपाय केले जातात. यामध्ये महिला त्यांच्या फिटनेसबाबत जास्तच जागरूक असतात. त्यांना त्यांच्या सौंदर्यासोबतच फिटनेसही महत्त्वाचा असतो. त्या फिट राहण्यासाठी काहीही करायला तयार असतात. तसंच 30 वर्षांवरील महिला नेहमीच त्यांच्या फिटनेसबाबत काळजी घेताना दिसतात. तर आज आपण अशा तीस वर्षांवरील महिलांसाठी काही फिटनेस टिप्स आहेत त्या जाणून घ्या.

हेल्दी पदार्थ खाणं प्रत्येकाच्या शरीराला आरोग्यदायी असतं. तसेच हेल्दी पदार्थ खाल्ल्यामुळे आपले शरीर निरोगी राहते, सोबतच मजबूत आणि फिटही राहण्यास मदत होते. कारण असे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला पोषक अशी तत्त्वे मिळतात. तर आज आपण तीस वर्षांवरील महिलांना फिट राहण्यासाठी काही हेल्दी डाएटबाबत जाणून घेणार आहोत.

फळे

महिलांनी त्यांच्या डायटमध्ये नेहमी फळांचा समावेश करावा. यामध्ये पपई आणि चेरी या फळांचा मोठ्या प्रमाणात समावेश महिलांनी जरूर करावा. कारण महिलांमध्ये स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. तसंच फळांचा समावेश डाएटमध्ये केल्यामुळे महिलांची स्किन फ्रेश राहते आणि त्यांची बुद्धी देखील नेहमी चंचल राहते.

दही

50 वर्षांपुढील महिलांना कॅल्शियमची खूप आवश्यकता असते. त्यामुळे अशा महिलांनी दह्याचा समावेश त्यांच्या आहारात करावा. दही हे शरीरासाठी आरोग्यदायी असते तसंच ते शरीराला थंडावाही देते. त्यामुळे महिलांनी त्यांच्या डाएटमध्ये दह्याचा समावेश आवर्जून करावा.

आळशीच्या बिया (जवस)

महिलांसाठी आळशीच्या बिया हा पदार्थ सर्वात सुपर असा पदार्थ आहे कारण आळशीच्या बिया या ब्रेस्ट कॅन्सर पासून महिलांचं संरक्षण करतात. त्यामुळे महिलांनी आळशीच्या बियांचं आवर्जून सेवन केलं पाहिजे. या बियांची तुम्ही पावडर करून खाऊ शकता किंवा ती पावडर पाण्यात भिजवून सुद्धा तुम्ही ते पिऊ शकता

शेंगदाणे

स्त्रियांना शेंगदाणे खाणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण शेंगादाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. तसंच शेंगदाणे खाल्ल्याने ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे स्त्रियांनी शेंगदाण्यांचा समावेश आपल्या आहारात नक्कीच करावा.

Follow Us
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री...
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री....
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा...
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा....
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात.
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक.
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान.
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार.
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट..
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट...
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार....
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार.....
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला.
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक.