Bleeding Piles : मूळव्याधाचा हॅपी एंडिंग, घरच्या घरी आराम देणारे पाच उपाय

मूळव्याध हा एक सर्वसामान्य आजार आहे,याची काही लक्षणे जाणवताच त्वरित त्याच्यावर उपचार करणे गरजेचे आहे.जर आपण कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला तर भविष्यात ही समस्या वाढून गंभीर आजारांमध्ये याचे रूपांतर होऊ शकते. मूळव्याधामध्ये अनेकदा गुद्दाशय आणि गुद्द्वार भागातून रक्त सुद्धा पडते.

Bleeding Piles : मूळव्याधाचा हॅपी एंडिंग, घरच्या घरी आराम देणारे पाच उपाय
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 8:57 AM

मुंबई : मूळव्याध (Piles) हा असा आजार आहे, जो कोणत्याही व्यक्तीला कधीही होऊ शकतो. या आजाराला मेडिकल भाषेत हॅमोराहोइड (Hemorrhoids) या नावाने ओळखले जाते. या आजारात प्रामुख्याने गुद्दाशय आणि गुद्द्वार येथील ठराविक भागावर त्याचा विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळतो. मूळव्याध या आजाराबद्दल बोलायचे झाल्यास हा आजार प्रामुख्याने बद्धकोष्टतेची समस्या उद्भवल्याने होत असतो. बहुतेक वेळा बद्धकोष्टता झाल्यावर पोट वेळेवर साफ होत नाही आणि अशा वेळी अनेकदा आपल्याला जास्त अतिरिक्त प्रमाणात प्रेशर द्यावा लागतो अशा वेळी गुद्दद्वार येथील ज्या नसा असतात त्यांच्यावर अतिरिक्त प्रमाणात ताण निर्माण होतो आणि परिणामी भविष्यात मूळव्याध होण्याची (Causes of Piles) लक्षणे दिसून येतात. अनेकदा ही समस्या निर्माण झाल्यावर नसातून रक्त सुद्धा पडते. मूळव्याधाचे दोन प्रकार असतात. पहिला सर्वसामान्य मूळव्याध आणि दुसरा प्रकार म्हणजे रक्ती मुळव्याध. पहिल्या प्रकारचा मूळव्याध असतो जो शरीराच्या आतील भागामध्ये निर्माण होतो तसेच दुसऱ्या प्रकारचा रक्ती मूळव्याध हा प्रामुख्याने गुद्दद्वार आजुबाजुच्या त्वचा खाली विकसित होतो. या दोन्ही प्रकारच्या मूळव्याधामध्ये अनेकदा रक्त पडण्याची शक्यता असते. मूळव्याधाचा त्रास जास्त प्रमाणात होत असेल तर अशा वेळी दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मूळव्याध आजारांमध्ये जर बाधित जागेवरून रक्त वारंवार पडत असेल तर याचा अर्थ असा की काहीतरी गंभीर समस्या नक्कीच आहे. अनेकदा मूळव्याध स्वतः बरा होऊन जातो परंतु अशावेळी काही पथ्य पाळणे सुद्धा गरजेचे आहे.

मूळव्याध लक्षणं

मूळव्याध मध्ये प्रामुख्याने मल त्याग करताना रक्त पडणे, वारंवार शौच लागण्याची भावना जाणवणे  गुद्दा जवळ गाठ होणे, गुद्दा जवळ वेदना होणे अशा अनेक समस्या उद्भवतात. रक्ती मूळव्याध वर उपचार म्हणून अनेक औषधे उपलब्ध आहेत परंतु बहुतेक वेळा हे डॉक्टरांकडून सर्जरी किंवा ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. मूळव्याध मुळापासून नष्ट करण्यासाठी काही घरगुती उपचार सुद्धा केले जातात परंतु हे उपचार योग्य पद्धतीने केल्याने काही प्रमाणात वेदना कमी करता येऊ शकतात. अनेकांना मूळव्याधाची लक्षणे लवकर जाणवत नाही परंतु तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवू लागला तर अशावेळी डॉक्टरांची भेट घेणे नेहमीच चांगले ठरते, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणत्या प्रकारच्या गंभीर स्वरूपाचा सामोरे जावे लागणार नाही.

घरच्या घरी करता येणारे काही उपाय

सिट बाथ

सिट बाथ द्वारे तुम्ही गुद्दा भागात होणाऱ्या वेदना आणि सूज कमी करू शकतात. सिट बाथ करण्यासाठी एका टबामध्ये गरम किंवा कोमट पाणी भरायचे आहे आणि त्यामध्ये एक झाकण बीटाडीन लिक्विड टाकून त्या पाण्यामध्ये काही काळ आपल्याला बसायचं आहे ,असे केल्याने तुम्हाला बरे वाटेल व वेदना सुद्धा काही प्रमाणात कमी होऊन जातील.

वेट वाइप्सचा करा वापर

टॉयलेट जाते वेळी कधीच टॉयलेट पेपरचा वापर करू नका असे केल्याने तुम्हाला भविष्यात त्रास होऊ शकतो म्हणूनच तुम्ही ओला टॉयलेट पेपरचा वापर करायला हवा यालाच आपण वेट वाइप्स असे सुद्धा म्हणतो. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की हा पेपर बिना सुगंधित असावा.

कोल्ड पॅकचा करा वापर

मूळव्याधामध्ये जेव्हा कधी आपल्याला टॉयलेटला जावे लागते तेव्हा वेदना भरपुर होतात. या वेदनेपासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही कोल्ड पॅकचा वापर करू शकता अशावेळी एका बादलीमध्ये थंडे पाणी आपल्याला भरायचे आहे आणि अशा पाण्यामध्ये 20 मिनिटापर्यंत बसायचे आहे असे केल्याने तुम्हाला बरे वाटेल.

पाणी आणि फायबरची मात्रा वाढवा

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून जर आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर अशावेळी दिवसभरातून भरपूर पाणी प्यायला पाहिजे तसेच आपल्या आहारामध्ये फायबरचे प्रमाण वाढविल्याने सुद्धा तुमचे पोट वेळेवर साफ होईल. ज्या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते असे पदार्थ आपल्याला आहारामध्ये समावेश करायला हवेत. या मध्ये हिरव्या भाजीपाला, ताजी फळे यांचा समावेश करायला पाहिजे. या पदार्थांमुळे बद्धकोष्टता दूर होतो.

शारीरिक दृष्ट्या सक्रीय रहा

आपणास सांगू इच्छितो की, मूळव्याध हा आजार प्रामुख्याने बद्धकोष्ठतामुळे उद्भवतो म्हणूनच बद्धकोष्ठते पासून आपल्याला सुटका मिळवायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त शारीरिक दृष्ट्या सक्रिय असणे गरजेचे आहे तसेच आपली आहार पद्धती व जीवन शैली आपल्याला बदलणे गरजेचे आहे.जर तुम्ही बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात खात असाल, मैदा युक्त पदार्थ, तेलकट, तुपकट असे पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त एक्ससाइज, रनिंग आणि इतर शारीरिक क्रिया कडे लक्ष देणे आवश्यक आहे.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या :

कोलेस्ट्रॉल वाढल्याच्या खुणा डोळ्यांवरही दिसतात? जाणून घ्या लक्षणं

तुम्हालाही ‘ही’ लक्षणे जाणवत असतील तर व्हा वेळीच सावध; असू शकतो पोटाचा अल्सर, हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Oral Cancer : ‘या’ गोष्टींची काळजी घेतल्यास कधीच होणार नाही तोंडाचा कर्करोग

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....