AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdev Baba: केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय

Ramdev Baba Give Solution on Hair Fall : केसगळतीमुळे अनेकजण त्रासलेले आहेत. लोक केस गळती कमी करण्यासाठी विविध प्रकारचे शाम्पू आणि औषधे वापरतात. मात्र रामदेव बाबांनी यावर एक आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे.

Ramdev Baba: केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
Ramdev baba on hair Fall
| Updated on: Nov 19, 2025 | 7:27 PM
Share

सध्याच्या बदललेल्या युगात केस गळणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. खासकरून युवकांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे अनेकांना कमी वयात टक्कल पजत आहे. लोक केस गळती कमी करण्यासाठी विविध प्रकारचे शाम्पू आणि औषधे वापरतात. मात्र आयुर्वेदिक पद्धतीने केस गळती थांबवता येते का? यासाठी काय करावे लागेल याबाबत पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू रामदेव बाबा यांनी माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केस गळती कमी कशी करायची?

रामदेव बाबांनी केस गळतीच्या प्रश्नावर बोलताना म्हटले की, केस गळती रोखण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय आहेत. यासाठी खास तेल वापरू शकता, यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. तेलाने मालिश केल्यास केस गळती कमी होऊ शकते. तसेच योगासन केल्यावरही केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते. तुम्हाला गंभीर शारीरिक समस्या नसेल तर तुम्ही शीर्षासन करू शकता. हे आसन केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण वाढते, जेणेकरून केसांची चांगली वाढ होते. याशिवाय तुम्हाला तुमच्या आहारातही बदल करावा लागेल.

आहारात आवळ्याचा समावेश करा

रामदेव बाबांनी सांगितले की, ‘आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, यामुळे केसांची वाढ सुधारते. तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता. त्याचबरोबर दुधी भोपळ्याचा रस पिणेही केसांसाठी फायदेशीर आहे. तसेच काळे आणि पांढरे तीळाचे सेवन करावे. यात असलेले मॅग्नेशियम आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच जवस खाल्ल्यानेही केसांचे आरोग्य सुधारते.

केस गळण्याची कारणे काय आहेत?

रामदेव बाबांनी सांगितले की, केस गळण्यासाठी खराब आहार आणि खराब जीवनशैली कारणीभूत आहे. काही लोकांचे केस अनुवांशिकतेमुळे देखील केस गळू शकतात. बऱ्याच लोकांचे केस कमी वयात गळतात, त्यामुळे बरेच लोक केसांवर रंग लावतात, त्यातील रसायणांमुळेही केस गळती होऊ शकते. त्यामुळे असे प्रकार टाळावेत.

टीप – केस गळती कमी करण्यासाठी कोणताही आयुर्वेदिक उपचार घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....