Fat Loss Tips: वजन घटवायचंय ? डाएटिंग नव्हे ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष

फॅट्स कमी करण्यासाठी तुम्ही सोप्या उपायांच्या शोधात असाल तर डाएटिंगऐवजी या पर्यायांवर लक्ष केंद्रित करा.

Fat Loss Tips: वजन घटवायचंय ? डाएटिंग नव्हे 'या' गोष्टींकडे द्या लक्ष
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 12:04 PM

नवी दिल्ली – डाएटिंग करणे (dieting) हा वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे, असे अनेक लोकांचे मत असते. अवघे 1-2 आठवडे डाएट करून ते वजन कमी करण्याचा प्रवास पूर्ण करू शकतात, असे त्यांना वाटते. डाएटिंगमुळे वजन नक्कीच कमी होते, पण त्यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत (affect on health) परिणाम होतो. चुकीच्या पद्धतीने डाएटिंग केल्याने उलटी होणे, चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा आणि स्नायूंमध्ये वेदना होणे, अशा समस्या उद्भवू शकतात. त्याशिवाय हृदय, फुफ्फुसं, लिव्हर आणि आतड्यांचेही नुकसान होते. जर तुम्हालाही वजन कमी करायची इच्छआ असेल तर डाएटिंगवर नव्हे ‘या’ गोष्टींवर लक्ष केंद्रित (try these methods for weight loss) करा.

नाश्ता करणे टाळू नका

सकाळचा नाश्ता हा आपल्या चांगल्या दिवसासाठी अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळे नाश्ता करणे अजिबात चुकवू नका. नाश्ता न केल्याने आपले मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचयाची क्रिया ही मंदावते ज्यामुळे कॅलरीज नीट बर्न होत नाहीत. जर सकाळी नीट नाश्ता केला नाही तर लोकं दुपारच्या जेवणाच्या वेळी लागलेली भूक शांत करण्यासाठी काही ना काही (असे) पदार्थ खातात, ज्यामुळे त्यांचे वजन वाढते. त्यामुळे दररोज सकाळी नाश्ता करणं अत्यंत गरजेचं आहे.

हे सुद्धा वाचा

हेल्दी स्नॅक्स खा

जेवणापूर्वी लागणारी छोटीशी भूक शांत करण्यासाठी सामोसे, भजी असे जंक फूड खाण्याऐवजी शेंगदाणे, मखाणे आणि ड्रायफ्रुटस यांचे सेवन करावे. यामुळे आपले पोटही भरते आणि फॅट्स किंवा चरबीही वाढत नाही.

खरी भूक आणि क्रेव्हिंग यातील फरक समजून घ्या

तुम्हाला खरंच वजन कमी करायचे असेल तर आपल्याला खरंच भूक लागली आहे की फक्त एखादा पदार्थ खायची क्रेव्हिंग (इच्छा) होत आहे, यातील फरक समजून घेणे अत्यंत महत्वाचे ठरते. बऱ्याच वेळेस आपल्याला काही पदार्थ खायची तीव्र इच्छा होते, आणि त्यावर नियंत्रण ठेवणेही कठीण होते. अशा वेळी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण तो पदार्थ खातो, ज्यामुळे वजन वाढते. मात्र जेव्हा तुम्हाली खरी भूक लागलेली असते आणि तुम्ही जेवता तेव्हा त्या (अन्नाचे) पचन सहजरित्या होते.

खाणे आणि झोप यात अंतर ठेवा

एखादा पदार्थ खाल्यानंतर लगेच झोपण्याची चूक कधीही करू नये. जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी दोन तासांचे अंतर तरी असले पाहिजे. जेवल्यानंतर 10 मिनिटे तरी चालावे. त्याशिवाय जेवणानंतर 5 – 10 मिनिटे वज्रासनात बसावे. हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

रोजचा व्यायाम महत्वाचा

तुम्हाला वजन कमी करायची खरंच इच्छा असेल तर रोज थोडा तरी व्यायाम केला पाहिजे. आपल्या दिनचर्येत हलक्या-फुलक्या व्यायामाचा समावेश करावा. चालायला जाणे, जॉगिंग करणे, पोहणे, डान्स करणे, एखादा खेळ खेळे अशा प्रकारच्या कोणत्याही शारीरिक हालचालीमुळे कॅलरी बर्न (कॅलरीज जळण्याच्या प्रक्रियेला) होण्याची गती वाढते. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभरातील थोडा वेळ तरी हलका व्यायाम करावा.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.