AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | या एका खास गोष्टीचा आहारात समावेश करा आणि हिमोग्लोबिनची कमतरता कायमची दूर करा!

आकडेवारीनुसार जगातील सुमारे एक चतुर्थांश लोक गंभीर अशक्तपणाने ग्रस्त आहेत आणि दक्षिण आशियातील सुमारे 75 टक्के लोक भारतात राहतात. यातील बहुतांश रुग्णही या समस्येला बळी पडतात कारण त्यांना मासिक पाळीमुळे (Menstrual cycle) मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सहन करावा लागतो.

Health | या एका खास गोष्टीचा आहारात समावेश करा आणि हिमोग्लोबिनची कमतरता कायमची दूर करा!
| Updated on: Jul 31, 2022 | 9:56 AM
Share

मुंबई : लाल रक्त पेशी म्हणजेच हिमोग्लोबिन (Hemoglobin) कमी झाल्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. हिमोग्लोबिन हा एक प्रकारचा प्रथिन आहे. जो लाल रक्तपेशींमध्ये असतो, जो तुमच्या शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन (Oxygen) वाहून नेण्याचे काम करतो. अशक्तपणामुळे थकवा, श्वास घेण्यास त्रास, त्वचा फिकट होणे, चक्कर येणे आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. आकडेवारीनुसार जगातील सुमारे एक चतुर्थांश लोक गंभीर अशक्तपणाने ग्रस्त आहेत आणि दक्षिण आशियातील सुमारे 75 टक्के लोक भारतात राहतात. यातील बहुतांश रुग्णही या समस्येला बळी पडतात कारण त्यांना मासिक पाळीमुळे (Menstrual cycle) मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सहन करावा लागतो.

आहाराकडे लक्ष देणे खूप महत्वाचे

अॅनिमियासारख्या समस्या टाळण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, अशी एक गोष्ट आहे, जी शरीरातील रक्ताची कमतरता फार लवकर पूर्ण करते आणि ती म्हणजे मनुका. जर महिलांनी मनुका आपल्या आहारात समाविष्ट केल्या तर त्या या समस्येपासून स्वतःला नक्कीच दूर ठेऊ शकतात. मात्र यासाठी रोज पाण्यात भिजवलेले मनुके खावे लागतील. येथे जाणून घ्या भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे.

तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

तज्ज्ञांच्या मते, मनुका लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बी-कॉम्प्लेक्स आणि फायबर अशा अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्याचा प्रभाव उष्ण मानला जात असला तरी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याचा परिणाम बदलतो. तुम्ही दररोज सुमारे मूठभर मनुके पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खा आणि त्यानंतर सुमारे एक तास काहीही खाऊ नका.

मनुके अधिक फायदेशीर

मनुका हाडे मजबूत करणारे अन्न देखील मानले जाते. त्यात कॅल्शियमही भरपूर असते. अशा स्थितीत रोज मनुका खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अशाप्रकारे, हाडांशी संबंधित सर्व समस्यांपासून शरीराचे संरक्षण होते. रोज भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीराला ऊर्जाही मिळते. यामध्ये फ्रक्टोज आणि ग्लुकोजसारखे घटक असतात, जे शरीराला झटपट ऊर्जा देण्याचे काम करतात. त्यामुळे शारीरिक कमजोरी, थकवा यासारख्या समस्या दूर होऊन शरीर निरोगी राहते.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.