दूषित हवामान, बदलती जीवनशैली, धावपळीचं जीवन आदी सर्वांचा परिणाम फुप्फुसांवर होताना दिसतो. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाविरुध्द लढा देत आहे. कोरोना काळात सर्वांनाच फुफ्फुसांचे (lungs) महत्व समजले. कोरोनाचा सर्वाधिक आघात हा फुप्फुसांवर झालेला आपणास बघायला मिळाला. रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमी झाल्याचा परिणाम आपल्या फुप्फुसांवर जाणवत असतो. फुफ्फुसांच्या निरोगी आरोग्यासाठी (healthy lungs) अनेक श्वसनाचे व्यायाम प्रभावी ठरले आहेत. कोरोना काळातदेखील निरोगी फुप्फुसांसाठी योग तसेच विविध श्वसनाचे व्यायाम करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला होता. फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या योगासनांबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. ही योगासने तुम्हाला फुप्फुसांच्या विविध आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतील.
सर्वप्रथम खांद्याच्या खाली तळवे घेऊन पोटावर झोपा. पाय एकत्र ठेवून बोटे बाहेर राहू द्यावेत, श्वास घ्या. उजवा हात वर करा आणि डावा पाय मागे न्या. गुडघ्यांना सरळ ठेवत डोके व छाती वर उठवा. श्वास सोडताना, शरीर खाली आणा आणि दुसऱ्या बाजूलाही अशा पद्धतीने करा. हे योगासन नियमितपणे केल्यास श्वसनासंबंधी आजारांचा धोका कमी होतो. एवढेच नाही तर असे केल्याने स्नायूंनाही आराम मिळतो.
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपावे. हात आणि पाय शरीराजवळ आणावे. हात नितंबांच्या खाली ठेवा, तळवे जमिनीवर ठेवा. आता गुडघे वाकवा आणि श्वास घेताना डोके आणि छाती वर काढा. आता छाती सैल करून डोके अशा प्रकारे खाली करा की त्यामुळे डोक्याचा वरचा भाग जमिनीला स्पर्श करेल. आता हात आणि पाय वरच्या दिशेने आणा. यावेळी हात आणि पाय एकमेकांना समांतर असावेत. हे आसन केल्याने श्वसनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.
आपले हात आपल्या मांडीवर किंवा आपल्या गुडघ्यावर ठेवा. पाठ, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करा आणि या अवस्थेत शरीरात असलेल्या सात चक्रांमधून उर्जा बाहेर पडत आहे आणि आपल्याला त्याचा लाभ मिळत असल्याची कल्पना करावी. जेवढा वेळ अशा आसनात बसता येईल तेवढे बसावे. या आसनामुळे स्नायूंना बळकटी मिळते. तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते.
धनुरासन
पोटावर झोपावे. गुडघे वाकवून कंबरेजवळ आणावे. आपले घोटे पकडण्यासाठी आपले हात जवळ न्यावे. श्वास घेत आपली छाती उचलण्याचा प्रयत्न करावा सोबतच आपले पाय मागे आणि वर खेचावेत. सरळ पाहून आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. या दरम्यान
हळूहळू श्वास घ्या आणि सोडावा. या आसनामुळे श्वसन नलिका ताणल्या जाऊन त्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते.
टीप : सदर मजकूर उपलब्ध माहितीच्या आधारावर आहे, याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये पोस्ट कोविड समस्यांचे प्रमाण कमी, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?
आयुर्वेदामध्ये सांगितली आहे जेवणाची योग्य पद्धत; तुम्ही देखील जाणून घ्या
लठ्ठपणाची समस्या आहे? मग कोरफडीचे नियमित सेवन करा; जाणून घ्या इतरही अनेक फायदे