AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपचन व छातीतील जळजळ सुद्धा असू शकते धोक्याची घंटा; ‘या’ आजाराचा धोका अधिक

भरपूर तंतुयुक्त पदार्थ,  फळे, ताजी फळे व भाज्या खाणे, होल ग्रेन पदार्थ, मुबलक जीवनसत्वे असलेले पदार्थ खाल्ल्याने या आजाराची शक्यता कमी होते. या आजारावर रेडिएशन थेरपी, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया या तीन पद्धतींनी उपचार करण्यात येतात.

अपचन व छातीतील जळजळ सुद्धा असू शकते धोक्याची घंटा; 'या' आजाराचा धोका अधिक
अपचन व छातीतील जळजळ सुद्धा असू शकते धोक्याची घंटा; 'या' आजाराचा धोका अधिकImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 31, 2022 | 3:40 PM
Share

मुंबई: तुम्हाला अपचन किंवा छातीत जळजळ (Acidity) होत असेल तर सावध व्हा! ही पोटाच्या व जठराच्या कर्करोगाची (cancer) लक्षणे असू शकतात. लवकर निदान झाले तर हा कर्करोग बरा होऊ शकतो. पण बरेचदा लसिका ग्रंथी व शरीराच्या इतर भागात हा कर्करोग पसरेपर्यंत त्याचे निदान होत नाही. ही लक्षणे इतर आजारांचीही असतात. त्यामुळे शरीरातील ही लक्षणे दिसली तर ताबडतोब वैद्यकीय तज्ज्ञांची भेट घ्या. जठराच्या कर्करोगाला पोटाचा कर्करोग असेही म्हणतात. यात जठराच्या अस्तरावर सामान्य पेशींची जागा कर्करोगाच्या पेशी घेतात. हा कर्करोग वेगाने पसरतो. त्यामुळे परिणामकारक उपचारांसाठी वेळेवर निदान महत्त्वाचे असते, असं मुंबईतील एचसीजी कॅन्सर सेंटरमधील ज्येष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. निनाद काटदरे (Dr. Ninad Katdare) यांनी सांगितलं.

छातीत जळजळ होणे, अपचन, अन्न गिळणे कठीण जाणे, भुकेच्या तीव्रतेत बदल, मळमळ, जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे, उलटी येणे, उलटीतून रक्त पडणे, पोटाला सूज येणे, बेंबीच्या वरील भागात अस्वस्थ वाटणे, पोटदुखी, थोडेसे अन्न पोटात गेल्या गेल्या पोट भरल्यासारखे वाटणे, विनाकारण वजन घटणे, हिमोग्लोबिन कमी होणे ही पोटाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत, असं डॉ. निनाद काटदरे म्हणाले.

या पदार्थांचे सेवन टाळा

GERD, गॅस्ट्रायटिस किंवा पेप्टिक अल्सरसारख्या आजारांचीही लक्षणे साधारण अशीच असतात. त्यामुळे औषधे घेऊनही ही लक्षणे कायम राहिली तर त्यांची सखोल तपासणी करून पोटाच्या कर्करोगाची शक्यता फेटाळून लावणे हितावह असते. पोटाच्या कर्करोगाचे वेळीच निदान झाले नाही तर तो जीवावर बेतू शकतो. पोट व अन्ननलिकेशी संबंधित आजार, स्थूलपणा, गॅस्ट्रायटिस, पोटाच्या कर्करोगाची कौटुंबिक पार्श्वभूमी, हेलिकोबॅक्टर पायलोरीला झालेला संसर्ग, पोटाला असलेली दीर्घकालीन सूज, अति प्रमाणात मद्यपान, धुम्रपान, तंबाखूसेवन, मेद, मीठाचे प्रमाण अधिक असलेल्या, धूर दिलेल्या पदार्थांचे किंवा पिकल्ड पदार्थांचे अति प्रमाणात सेवन हे घटक पोटाच्या कर्करोगासाठी कारणीभूत असतात.”, असे ते म्हणाले.

तीन पद्धतींनी उपचार

भरपूर तंतुयुक्त पदार्थ,  फळे, ताजी फळे व भाज्या खाणे, होल ग्रेन पदार्थ, मुबलक जीवनसत्वे असलेले पदार्थ खाल्ल्याने या आजाराची शक्यता कमी होते. या आजारावर रेडिएशन थेरपी, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया या तीन पद्धतींनी उपचार करण्यात येतात, अशी पुष्टी डॉ. काटदरे यांनी केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.