AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खा-खा सुटली आहे ? सतत भूक लागत असेल तर या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

असे बरेच लोक आहेत ज्यांना जेवल्यानंतर काही वेळातच पुन्हा भूक लागते. यामागे काय कारणे आहेत ? जेव्हा तुम्ही शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न खाता, तेव्हा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

खा-खा सुटली आहे ? सतत भूक लागत असेल तर या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 03, 2023 | 10:28 AM
Share

नवी दिल्ली : सहसा, एकदा जेवल्यनंतर आपल्याला काही तास भूक (hungry)लागत नाही. पण काही लोक असे असतात ज्यांना पोटभर जेवल्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा भूक लागते. त्याच वेळी, काही लोक असेही असतात, जे रागावल्यावर किंवा दुःखी असताना स्वतःला शांत करण्यासाठी इमोशनल इटिंग (emotional eating) सुरू करतात. जास्त खाण्यामागे अनेक कारणे असू शकतात, परंतु त्यामागील नेमके कारण शोधणे खूप गरजेचे आहे. जास्त अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा (obesity) आणि हृदयाशी संबंधित (heart related problems)समस्या उद्भवतात. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न खाता तेव्हा तुम्हाला सूज येणे, छातीत जळजळ आणि पचनाशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

जास्त भूक लागण्यामागे नेमके काय कारणे असतात, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया –

झोप पूर्ण न होणे

जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुम्हाला गरजेपेक्षा जास्त भूक लागू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का ? कारण झोपेच्या कमतरतेमुळे तुमची भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. ज्या लोकांना झोप येत नाही, त्यांना खूप भूक लागते आणि जेवल्यानंतरही त्यांचे पोट भरल्यासारखे वाटत नाही.

प्रोटीन्सची कमतरता असणे

शरीरात प्रोटीनची कमतरता असतानाही तुम्हाला सारखी-सारखी भूक लागते. प्रथिने किंवा प्रोटीन्स हे तुमची भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमची कॅलरी कमी होते. आहारात प्रथिनांचा समावेश केल्याने शरीरात काही हार्मोन्सचे उत्पादन वाढते जे तुम्हाला पोट भरण्याचे संकेत देतात आणि तुमची भूक नियंत्रित करतात.

डिहायड्रेशन

आपल्या शरीराचे कार्य योग्य रितीने चालण्यासाठी, जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. तुमच्या हृदयाचे आरोग्य, मेंदूचे आरोग्य आणि पाचक आरोग्यासाठी पाणी खूप फायदेशीर मानले जाते. पाणी तुम्हाला पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हा कमी पाणी पिता, तेव्हा तुम्हाला वारंवार खूप भूक लागते.

मधुमेह

मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना सामान्य लोकांपेक्षा जास्त भूक लागते. असे घडते कारण रक्तातील ग्लुकोज इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे तुमचे शरीर अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला सतत भूक लागते. जास्त तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, अंधुक दृष्टी, थकवा आणि पाय आणि हातांना मुंग्या येणे, अशी काही मधुमेहाची लक्षणे दिसू लागतात.

गरोदरपणा

जास्त भूक लागण्यामागे गरोदरपणा हे देखील आणखी एक कारण आहे. तुमचे शरीर असे करते, जेणेकरून तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला सर्व आवश्यक पोषक द्रव्ये मिळू शकतील. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आणि योग्य अंतराने खाणे महत्त्वाचे आहे.

भूक कंट्रो करण्यासाठी आहारात करावेत हे बदल

– आहारात अंडी, दही इत्यादी प्रोटीनने मुबलक अशा पदार्थांचा आहारात समावेश करा.

– जास्त मीठ असलेल्या आणि अती गोड पदार्थांचे सेवन टाळा.

– नेहमी हायड्रेटेड रहावे. भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. तुम्ही वेगवेगळ्या ज्यूसचेही सेवन करू शकता.

– अल्कोहोलचे कमीत कमी सेवन करा. दारू प्यायल्यानंतर तुमची भूक वाढते.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....