भूक लागल्यावर तुमचंही डोक दुखतं का ? जाणून घ्या हंगर हेडेक म्हणजे काय ?
आजकाल डोकेदुखीचा त्रास कशामुळेही होऊ शकतो. हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. काही लोकांना तर भूक लागल्यावर त्यांचं डोकं दुखू लागतं.

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : डोकेदुखी (headache) हा आजाकाल कॉमन प्रॉब्लेम झाला आहे. कामाचे प्रेशर, स्ट्रेस, अपुरी झोप, वेळी-अवेळी जेवण या पैकी कोणत्याही किंवा अन्य कारणांमुळेही डोकेदुखी होऊ शकते. काही लोकांना तर भूक (hunger hedache) लागल्यावर त्यांचं डोकं दुखायला लागतं. बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की दोन जेवणांच्या किंवा खाण्याच्या वेळेत खूप मोठी गॅप पडली किंवा जास्त वेळ लागला तर तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो. या वेदनांसाठीही अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.
भूक लागल्यानंतर डोकेदुखी का होते, त्यामागचं लॉजिक काय आहे, व त्यापासून बचाव कसा करावा हे जाणून घेऊया.
भूक लागल्यावर शरीरात काय बदल होतात ?
खरं तर, भूक लागल्यावर पोट फुगणे, थकवा येणे, एनर्जीचा अभाव , हाताला कंप सुटणे, घाम येणे, पोटदुखी, थंडी वाजणे, चिडचिड होणे यासारखी लक्षणे दिसतात.
भूक लागल्यावर डोकेदुखी का सुरू होते ?
भूक लागल्यावर डोकेदुखी सुरू होते, त्यामागचं कारण म्हणजे डिहायड्रेशन आणि शरीरातील ग्लूकोज लेव्हल कमी होऊ लागते. जेव्हा डोक्यातील ग्लूकोज लेव्हल कमी तेव्हा हाइपोग्लाइसीमिया मिळवण्यासाठी मेंदूतून ग्लूकागोन, कार्टिसोल और ॲड्रेनालाइन सारखी हार्मोन्स रिलीज होतात. ज्यामुळे शरीरात अनेक साईड इफेक्ट्स दिसू लागतात. त्यापैकीच एक म्हणजे डोकेदुखी. त्यासह डिहायड्रेशन, कॅफेनची आणि खाण्याची कमतरता यामुळे ब्रेन टिश्यूंना त्रास होऊ लागते. ज्यामुळे पेन रिसेप्टर्स ॲक्टीव्ह होतात व डोक्यात वेदना होतात.
भुकेमुळे डोकं दुखत असेल तर काय करावं ?
खरंतर, भुकेमुळे सुरू झालेली डोकेदुखी ही डिहायड्रेशनमुळे होऊ शकते म्हणजेच पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होऊ शकते. जर तुम्हाला खूप भूक लागली असेल आणि डोकेदुखीचा त्रास होत असेल तर थोडं-थोडं पाणी प्यायला हवं. अशा वेळी तुम्ही लिंबू सबरतही पिऊ शकता.
भुकेमुळे डोकं दुखत असेल तर सफरचंद किंवा संत्र यासारखे एखादे फळ खावे.
पण भुक लागल्यावर तुम्ही चॉकलेट किंवा ज्यूसचे सेवन करत असाल तर तसे करणे टाळावे. कारण असे केल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
हंगर हेडेक म्हणजेच भूकेमुळे होणारी डोकेदुखी टाळण्यासाठी, वेळोवेळी हेल्दी, पौष्टिक अन्न खावे. कोणतेही जेवण टाळू नका. जास्त कामामुळे जेवायला वेळ मिळत नसेल तर द्रव पदार्थांचे सेवन करावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
