AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांनो, फक्त प्रेग्नंट आहात म्हणूनच नाही, ‘या’ कारणांमुळेही चुकू शकते मासिक पाळी

मासिक पाळी चुकली की महिलांच्या मनात पहिला विचार येतो की आपण गर्भवती आहोत की काय, पण गर्भधारणेव्यतिरिक्त, मासिक पाळी चुकण्याची अनेक कारणे आहेत. काहीवेळा जीवनशैलीतील बदलही तुमच्या मासिक पाळीत गोंधळ घालू शकतात.

महिलांनो, फक्त प्रेग्नंट आहात म्हणूनच नाही, 'या' कारणांमुळेही चुकू शकते मासिक पाळी
Image Credit source: freepik
| Updated on: Mar 27, 2023 | 7:40 AM
Share

नवी दिल्ली :  मासिक पाळी (menstrual period) हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला हा अतिशय महत्वाचा भाग आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मासिक पाळी चुकली तर महिलांच्या मनात पहिला विचार येतो की कदाचित त्या गर्भवती (pregnancy) आहेत का ? परंतु गर्भधारणेव्यतिरिक्त, मासिक पाळी चुकण्याची अनेक कारणे आहेत. काहीवेळा जीवनशैलीतील बदलामुळेही (lifestyle changes) तुमची मासिक पाळीचे वेळापत्रक बिघडू शकते अथवा मासिक पाळी चुकू शकते. तथापि, मासिक पाळी उशीरा येत असेल किंवा ती वारंवार चुकत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

अविवाहित स्त्रिया किंवा गर्भधारणेसाठी तयार नसलेल्या स्त्रियांसाठी मासिक पाळी न येणे हे एक भयानक स्वप्न आहे. कोणत्याही स्त्रीला हा अनुभव घ्यायचा नसतो. परंतु मासिक पाळी कमी होण्याचे हे एकमेव कारण नाही. जीवनशैलीचे काही घटक, आजारपण, काही औषधे किंवा महिलेची शारीरिक स्थिती यांचाही मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही गरोदर नसाल तर मासिक पाळी उशीरा येण्याची सर्वात सामान्य कारणे ही वजन कमी होणे, हार्मोनल असंतुलन आणि रजोनिवृत्ती असू शकतात.

मासिक पाळी उशीरा येत असेल तर असे ओळखा

जर तुमची पाळी (मासिक पाळी) 28 दिवसांची असेल आणि तुम्हाला ती 29 किंवा 30 दिवसांपर्यंत येत नसेल तर याचा अर्थ तुमची मासिक पाळी उशीरा आली आहे. हे बर्‍याच वेळा घडते आणि काळजी करण्यासारखे काहीही नाही. परंतु जर तुम्हाला 40 दिवसांपेक्षा जास्त काळ मासिक पाळी येत नसेल तर तुम्ही ती पिरियड मिस म्हणून समजू शकता. असे वारंवार होत असल्यास, अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्यावे.

1) तणाव

जास्त ताण तुमच्या शरीरात गोनाडोट्रोपिन-रिलीझिंग हार्मोन (GnRH) च्या उत्पादनात व्यत्यय आणतो. हे हार्मोन तुमचे ओव्हुलेशन आणि मासिक पाळी नियंत्रित करण्याचे काम करते. मासिक पाळीला विलंब शारीरिक आणि मानसिक तणावामुळे होऊ शकतो. खूप तणावपूर्ण परिस्थितीमुळे मासिक पाळीचा कालावधी गमावणे ही मोठी गोष्ट नाही. तथापि, जर तुम्ही बऱ्याच काळापासून तणावाखाली असाल आणि तुम्हाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ मासिक पाळी येत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एकदा तुमचा ताण सामान्य पातळीवर परत आला की काही महिन्यांत तुमचे मासिक चक्र देखील सामान्य होईल.

2) हाय इंटेसिटी वर्कआऊट

उच्च तीव्रतेच्या वर्कआउट्समुळे तुमच्या पिट्यूटरी आणि थायरॉईड संप्रेरकांमध्ये बदल होऊ शकतात जे तुमच्या मासिक पाळीवर आणि शरीराच्या ओव्हुलेशन प्रक्रियेवर परिणाम करू शकतात. दररोज एक किंवा दोन तास व्यायाम केल्याने तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होत नाही, परंतु यापेक्षा जास्त काळ व्यायाम केल्याने हे हार्मोनल बदल होऊ शकतात. जर तुम्हाला जास्त व्यायाम करायचा असेल तर त्यापूर्वी स्पोर्ट्स मेडिसिन हेल्थकेअर तज्ञाचा सल्ला घ्या. याचा अर्थ असा होईल की तज्ञ प्रथम आपल्या शरीरास यासाठी तयार करतील जेणेकरून उच्च तीव्रतेच्या वर्कआउटचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ नयेत.

3) लाइफस्टाइलमध्ये बदल

शेड्यूल बदलल्याने तुमच्या शरीराच्या प्रणालीवर खूप वाईट परिणाम होतो, जरी तुम्हाला सुरुवातीला ते जाणवले नाही. जर तुम्ही दिवसा आणि कधी रात्रीची शिफ्ट करत असाल किंवा तुमचे वेळापत्रक सामान्यत: अनियमित असेल, तर याचा तुमच्या मासिक पाळीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. यामुळे, तुमची मासिक पाळी लवकर किंवा उशिरा येऊ शकते.

4) औषधांचा परिणाम

अँटीडिप्रेसेंट्स, अँटीसायकोटिक्स, थायरॉईड औषधे, अँटीकॉनव्हलसंट्स आणि काही केमोथेरपी औषधे यांसारखी काही औषधे देखील तुमच्या मासिक पाळीवर परिणाम करू शकतात. याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांमुळे तुमच्या मासिक पाळीत अडथळा निर्माण होतो.

5) वजनामध्ये बदल किंवा वजन वाढणे

कधीकधी तुमच्या वाढत्या किंवा कमी होत असलेल्या वजनामुळे तुमच्या मासिक पाळीवरही परिणाम होतो. लठ्ठपणाचा इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सवर परिणाम होतो आणि त्यामुळे प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.

जास्त वजन हे देखील मासिक पाळी न येण्याचे एक कारण असू शकते. वजन कमी केल्याने महिलांमध्ये मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. गंभीरपणे कमी वजनामुळे नियमित मासिक चक्रांवर देखील परिणाम होतो. जेव्हा शरीरात चरबी आणि इतर पोषक तत्वांची कमतरता असते, तेव्हा शरीराला हवे तसे हार्मोन्स तयार करता येत नाहीत. या स्थितीत तुमच्या मासिक पाळीचा त्रास होतो.

6) मेनोपॉज

रजोनिवृत्ती ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये स्त्रियांमध्ये मासिक पाळीची प्रक्रिया संपुष्टात येऊ लागते. तथापि, याआधी, तुम्हाला फिकट, कमी किंवा जास्त वेळा मासिक पाळी येऊ शकते. स्त्रिया जेव्हा प्रीमेनोपॉजच्या टप्प्यातून जातात तेव्हा ही समस्या आणखी वाढते. यामुळे त्यांना वाटते की त्या कदाचित गरोदर आहेत की काय, ज्यामुळे अनेक वेळा महिला मानसिक तणावाच्या बळी ठरतात. अशा परिस्थितीत मासिक पाळी चुकल्यास महिलांनी अस्वस्थ होण्याऐवजी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.