AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमुळे आत्महत्यांच्या घटना वाढल्या, 31-50 वयोगटात आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

लॉकडाऊनमुळे देशात आत्महत्यांच्या घटना वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2019मध्ये देशात 139 लोकांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. (Committed Suicide)

लॉकडाऊनमुळे आत्महत्यांच्या घटना वाढल्या, 31-50 वयोगटात आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक; तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 7:42 AM
Share

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे देशात आत्महत्यांच्या घटना वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2019मध्ये देशात 139 लोकांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 18 ते 45 वयोगटातील 67 टक्के लोकांचा समावेश होता. त्यामुळे या आत्महत्यांच्या घटनांवर चिंता व्यक्त केली जात आहे. (lockdown increased suicide cases, men between 31-50 years committed suicide the most during lockdown)

नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. देशात 2019मध्ये आत्महत्यांच्या घटनेत वाढ झाली असली तरी या घटना रोखल्या जाऊ शकतात, असं डॉ. रचना आवत्रमणी यांनी म्हटलं आहे. या घटना रोखल्या जाऊ शकतात. फक्त आत्महत्या करणाऱ्यांना केवळ तीन गोष्टी सांगा. पहिली गोष्ट म्हणजे मी तुझ्यासाठी इथे आहे. तुझ्यासाठी ही परिस्थिती अत्यंत कठिण आहे, हे मी जाणतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे समोरची व्यक्ती आत्महत्या का करत आहे त्या कारणाचा शोध घ्या आणि त्याला एखाद्या तज्ज्ञाला दाखवा. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला या कठिण परिस्थितीत त्याच्यासोबत आहात हे सांगता किंवा त्यांचं दु:ख, वेदना, मनोदशा तुम्ही समजू शकता याची त्याला जाणीव करून देता तेव्हा त्या व्यक्तिच्या मनातील आत्महत्येचे विचार निघून जातात. असे केल्यास भारतात आत्महत्येच्या केसेसमध्ये घट होईल, असं आवत्रमणी यांनी म्हटलं आहे.

म्हणून केसेस वाढल्या

मनोरुग्ण चिकित्सक डॉ. समीर मल्होत्रा यांच्या मतानुसार, कोरोना महामारीने लोकांना चिंताग्रस्त केले असून त्यांना हतबल केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. म्हणून या काळात लोकांनी स्वत:लाच त्रास देण्याचा प्रयत्न केला. काही घटनांमध्ये ही महामारी मृत्यूचं कारणही बनली आहे. तर, लॉकडाऊनच्या काळात भारतात आत्महत्या आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. याची अनेक कारणं आहेत. सोशल नेटवर्क न राहणं, कोरोनाची लागण होण्याची भीती, आरोग्य सेवांबाबतची अपुरी माहिती, सामाजिक विघटन, मानसिक तमाण आणि कुटुंबावर ओझं होत असल्याची भीती यामुळे या घटना घडल्याचं पोद्दार फाऊंडेशन मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. प्रकृती पोद्दार यांनी सांगितलं.

‘या’ वयोगटात सर्वाधिक आत्महत्या

2019 च्या तुलनेत लॉकडाऊनच्या टप्प्यात अधिक वयाच्या लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली होती. 31 ते 50 वयोगटातील हे लोक होते. आश्चर्य म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक होती. धक्कादायक म्हणजे लॉकडाऊनच्या काळात शालेय विद्यार्थ्यांमध्येही आत्महत्येची प्रवृत्ती वाढल्याचंही सांगितलं जातं.

म्हणून आत्महत्या

एका तरुणाने नाव छापण्याच्या अटीवरून आपबिती ऐकवली. लॉकडाऊनच्या काळात तो घरात कैद होता. जीवनाचा काहीच उद्देश राहिला नाही असं त्या काळात त्याला वाटत होतं. ज्या मुलींवर तो प्रेम करत होता, ती घरकामात मग्न झाली. ऑनलाईन क्लासचाही कंटाळा आला होता. त्याच्या वडिलाची नोकरी गेली आणि घरातील वातावरण खराब झालं. तेव्हा त्याला जीवनापासून दूर जाण्यासाठी आत्महत्येशिवाय काहीच पर्याय नसल्याचं वाटलं.

वृद्ध आणि बालकांवर अधिक परिणाम

कोरोना महामारीचा फटका प्रत्येक वर्गाच्या लोकांना बसला. यामुळे लहान मुलं आणि वृद्ध अधिक प्रभावित झाले. अनेक मुलांचं आई-वडिलांचं छत्रं हरवलं. त्यामुळे त्यांचं वर्तन बदललं. महामारीमुळे जीवनसाथी गमावलेले बुजुर्ग लोक एकाकी पडले. एकटेपणा आणि दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. त्यामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावू लागले.

कौटुंबीक कारणं

तज्ज्ञांच्या मते 37.2 टक्के आत्महत्या कौटुंबीक समस्यांमुळे तर 17.1 टक्के आत्महत्या आजारपणामुळे झाल्या आहेत. इशाऱ्याचे संकेत लवकरात लवकर ओळखता आले तर आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात, असं पोद्दार यांनी सांगितलं. (lockdown increased suicide cases, men between 31-50 years committed suicide the most during lockdown)

संबंधित बातम्या:

आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, हत्या करत देहाची विटंबना, डोळे काढले, हाताची बोटं दगडाने ठेचले

गर्भवती महिलांना भीतीदायक स्वप्ने का पडतात?; जाणून घ्या कारणं!

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली, कोरोनाबळींतही वाढ सुरुच

(lockdown increased suicide cases, men between 31-50 years committed suicide the most during lockdown)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.