Health : ‘ही’ एक गोष्ट 15 सिगारेटची बरोबरी, WHO नेही सांगितलं ठरू शकते जीवघेणी
WHOच्या मते, एकाकीपणा हा चिंताजनक असून तो अनेक जीवघेण्या आजारांना निमंत्रण देतो. तसंच सध्याच्या परिस्थितीत तर 15 सिगरेट ओढल्यानंतर जेवढे आजार होऊ शकतात तेवढेच एकाकीपणामुळे होतात.
मुंबई : आजकाल बहुतेक लोकांना मानसिक आजार सतावताना दिसतात. ताण-तणाव, बदलती जीवनशैली अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना मानसिक आजार होताना दिसतात. तर आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मानसिक आजाराबाबत मोठं कारण उघड केलं आहे. WHOनं एकाकीपणाला मानसिक आजाराचं कारण दिलं आहे. एकाकीपणाला WHOनं जागतिक सार्वजनिक आरोग्य चिंतेचे कारण घोषित केले आहे. तसंच WHOनं या समस्येवर एक आंतरराष्ट्रीय आयोग देखील सुरू केला आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एकटेपण हे दिवसाला 15 सिगरेट पिण्याइतके वाईट आहे. तसेच एकटेपणा हा लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियतेच्या वाढीस देखील संबंधित आहे. त्यामुळे सध्याच्या काळात ज्येष्ठ लोकं, तरुण तरुणाई या मानसिक आजारांना मोठ्या प्रमाणात बळी पडताना दिसत आहेत.
एकटेपणामुळे अनेक गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता असते. मग यामध्ये 50% स्मृतिभ्रंश होण्याचा धोका असतो. तर तीस टक्के स्ट्रोकचा धोका निर्माण होतो तसेच 50% कोरोनारी धमनी रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजकालच्या तरुणांचे आयुष्य कमी होते. तर आफ्रिकेमध्ये 12.7% तरुणाईला एकटेपणाचा अनुभव आला आहे. तर युरोपमध्ये 5.3% एकाकीपणामुळे अनेक गंभीर आजार निर्माण होताना दिसत आहेत. सध्याच्या काळात पाच ते पन्ना पंधरा टक्के तरुण एकाकीपणाचे आयुष्य जगताना दिसतात.
एकाकीपणामुळे आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतो. मग डिप्रेशन, एनझायटी, ताणतणाव असे अनेक मानसिक आजार निर्माण होत असतात. त्यामुळे कधीही एकटेपणाने राहू नका. जर तुम्हाला एकटे वाटत असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवा, परिवारासोबत वेळ घालवा किंवा स्वतःला एखाद्या कामात व्यस्त ठेवा. यामुळे तुमचा एकटेपणा नाहीसा होईल. तसेच नवीन मित्र बनवा, लोकांशी बोलत रहा, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला मानसिक आजारांचा सामना करावा लागणार नाही.