AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनो ‘ही’ एक चूक करत असाल तर स्वत: आयुष्य करताय कमी, जाणून घ्या!

आता प्रत्येकजण ऑफिसमध्ये काम करतोच, मात्र कामाच्या प्रेशर आणि टार्गेटमुळे सर्वजण एक गोष्ट विसरत चालले आहेत. तासनतास काम करतात आणि त्यानंतर आराम मात्र यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट राहून जाते. त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.

Health : ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनो 'ही' एक चूक करत असाल तर स्वत: आयुष्य करताय कमी, जाणून घ्या!
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 28, 2023 | 12:10 AM
Share

मुंबई : बहुतेकजण ऑफिसमध्ये डेस्कवर बसून काम काम करतात. दररोज बसून काम असल्यामुळे लोकांच्या शरीराची हालचाल होत नाही. मात्र लोक याकेड जास्त गांभीर्याने लक्ष देत नाहीत. पण रोज बसून काम केल्यामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. अशातच नुकत्याच झालेल्या एका संशोधनामध्ये, एकाजागी जास्त वेळ बसून काम केल्यामुळे लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो असं समोर आलं आहे.

आपण जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे आपल्या एनर्जीचा वापर होत नाही. जर आपण आपल्या एनर्जीचा वापर नाही केला तर अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. एका जागी बसून राहिल्यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, डायबिटीस सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त वेळ बसून राहिल्यामुळे शरीरातील चरबी झपाट्याने वाढते. तसेच हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या घातक आजारांचा धोकाही निर्माण होतो.

कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, जे लोक ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी बसून काम करतात त्यांना हृदयविकाराचा धोका असतो. तसंच जे लोक आठ तासांहून अधिक वेळ बसून काम करतात त्यांना स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका 20 वाढतो, अशी माहिती चायनीज अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि पेकिंग युनियन मेडिकल कॉलेजने केलेल्या अभ्यासात  देण्यात आली आहे

दरम्यान, गेली 11 वर्ष करण्यात आलेल्या अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, एका जागेवरच काम असेल तर थोडा ब्रेक घ्यावा. तसेच जे लोक बसून काम करतात अशा लोकांनी दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. अन्यथा त्यांना या आजारांचा सामोरं जावू लागू शकतं. त्यामुळे वेळीच सतर्क व्हा आणि व्यायामाला लागा.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.