AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकघरातूनच तुमच्या शरीरात शिरतंय विष, आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर

तुमच्या स्वयंपाकघरातील कोणत्या छोट्या चुकांमुळे शरीरात मायक्रोप्लास्टिकचे विष शिरत आहे. तुमच्या इतर सवयी कशा बदलाव्यात, याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

स्वयंपाकघरातूनच तुमच्या शरीरात शिरतंय विष, आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर
kitchen
| Updated on: Apr 10, 2026 | 12:57 PM
Share

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात प्लास्टिक हे आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. सकाळी प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्यापासून ते प्लास्टिक कंटेनरमधून आलेले पार्सल खाण्यापर्यंत सर्वच गोष्टीत आपण प्लास्टिकचा वापर करत असतो. मात्र आता हेच प्लास्टिक मायक्रोप्लास्टिकच्या स्वरूपात आपल्या अन्नातून, पाण्यातून आणि अगदी श्वासावाटेही शरीरात प्रवेश करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आपले स्वयंपाकघर हे या सूक्ष्म प्लास्टिक कणांचे सर्वात मोठे स्त्रोत ठरताना दिसत आहे.

तज्ज्ञांच्या मते, मायक्रोप्लास्टिक पूर्णपणे टाळणे हे कठीण आहे. मात्र आपण काही दैनंदिन सवयीत बदल करुन त्याचा धोका नक्कीच कमी करू शकतो. प्लास्टिकच्या भांड्यांना उष्णता लागल्यास किंवा प्लास्टिक बोर्डवर अन्न कापताना अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण अन्नात मिसळतात. हे कण शरीरात साठल्याने दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यावर मात करण्यासाठी उपाय सुचवण्यात आले आहेत.

१. प्लास्टिक भांड्यांना बंदी

अन्न साठवण्यासाठी किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यासाठी प्लास्टिक ऐवजी काचेच्या (Glass) किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा.

२. लोखंडी आणि स्टीलच्या भांड्यांचा वापर

नॉन-स्टिक पॅनवरील कोटिंग खराब झाल्यावर त्यातून प्लास्टिकचे कण अन्नात जातात. त्यामुळे स्वयंपाकासाठी लोखंडी तवा (Cast Iron) किंवा स्टीलच्या कढईला प्राधान्य द्या.

३. चॉपिंग बोर्डमध्ये बदल

प्लास्टिक चॉपिंग बोर्डऐवजी लाकडी किंवा बांबूच्या बोर्डचा वापर करणे अधिक सुरक्षित आहे, कारण प्लास्टिक बोर्डवर सुरीने कापताना त्याचे सूक्ष्म कण अन्नात मिसळतात.

४. पाण्याच्या बाटल्यांबाबत खबरदारी

प्लास्टिक बाटल्यांमधील पाण्यात सूक्ष्म कणांचे प्रमाण अधिक असते. प्रवासात किंवा घरी स्टील, तांबे किंवा काचेच्या बाटल्यांचा वापर करणे आरोग्यासाठी हिताचे ठरेल.

५. टी-बॅग्ज टाळा

आजकल मिळणाऱ्या अनेक टी-बॅग्जमध्ये प्लास्टिकचे तंतू असतात. गरम पाण्यात या बॅग्ज टाकल्यास अब्जावधी सूक्ष्म कण चहात उतरतात. त्याऐवजी साधी चहापत्ती वापरणे सर्वोत्तम ठरते.

शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचे उपाय

तज्ज्ञांच्या मते, शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करावा. तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ, फळे आणि पालेभाज्यांचा समावेश वाढवावा, ज्यामुळे पचनसंस्था स्वच्छ राहते. तसेच नियमित व्यायाम आणि घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आरओ (RO) फिल्टर वापरावेत, जे मायक्रोप्लास्टिक रोखण्यासाठी प्रभावी ठरतात. वेळोवेळी केलेले हे छोटे बदल आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भविष्यातील मोठ्या आरोग्य समस्यांपासून वाचवू शकतात.

Follow Us
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.