Migraine : ‘मायग्रेन’ साठी उपयोगी ठरू शकतात ‘ही’ योगासने; जाणून घ्या, कोणती आसने फायदेशीर मानतात तज्ञ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 07, 2022 | 4:52 PM

मायग्रेन वेदना खूप अस्वस्थ करणारा आजार आहे. ज्या लोकांना अनेकदा मायग्रेनची समस्या असते, त्यांच्यासाठी दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करणे कठीण होते. या समस्येपासून मुक्ती मिळावी यासाठी लोक अनेक उपाय करतात. तज्ज्ञांच्या मते, काही योगासनेही मायग्रेनसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

Migraine : ‘मायग्रेन’ साठी उपयोगी ठरू शकतात ‘ही’ योगासने; जाणून घ्या, कोणती आसने फायदेशीर मानतात तज्ञ
योगासणे
Image Credit source: unsplash.com

 मुंबई : मायग्रेन वेदना खूप अस्वस्थ करणारा आजार आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, मायग्रेनची वेदना (Migraine pain) तीव्र असू शकते आणि प्रकाश आणि आवाजाच्या संवेदनशीलतेचाही त्रास पेन्शटला होऊ शकतो. काही परिस्थितींमुळे मायग्रेनचा हल्ला होऊ शकतो, ज्याबद्दल सर्व लोकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे. ज्या लोकांना अनेकदा मायग्रेनची समस्या असते, त्यांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्याच्या दीर्घकालीन उपचार (Long term treatment) पद्धती वापरत राहावी. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मायग्रेन हा एक सायकोसोमॅटिक डिसऑर्डर असू शकतो. म्हणजेच यावरून असे दिसून येते की, तुमच्यामध्ये काही प्रकारची मानसिक समस्या जन्म घेत आहे. मायग्रेनची लक्षणे कमी करण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी योगासनांची सवय लावणे तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर (Especially beneficial) ठरू शकते. योगामुळे तुम्हाला वेदनांच्या तीव्रतेपासून वाचवता येतेच, पण मायग्रेनचा झटका रोखण्यासाठीही ते फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या, मायग्रेनच्या समस्येवर कोणत्या योगासनांचा सराव फायदेशीर ठरू शकतो?

अभ्यासात काय आढळले?

मेडिकल जर्नल न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या 2020 च्या अभ्यासात असे आढळून आले की, 3 महिने योगासने करणाऱ्या मायग्रेनग्रस्तांना फक्त औषधोपचार करणाऱ्यांपेक्षा कमी तीव्र डोकेदुखीचा अनुभव आला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मायग्रेन केवळ योगाद्वारे बरा होऊ शकत नसला तरी डोकेदुखीची तीव्रता आणि मायग्रेनला कारणीभूत घटक कमी करण्यासाठी योगासन उपयुक्त ठरू शकतात.

या योगासनांमुळे तुम्हाला फायदे मिळू शकतात

आरोग्य तज्ज्ञ सांगतात, मायग्रेनच्या बाबतीत रक्तवाहिन्या पसरतात. यामुळे डोक्यात रक्त प्रवाह वाढतो, म्हणून तुम्ही योगासनांचा सराव करावा ज्यामध्ये तुमचे डोके तुमच्या छातीच्या वर असेल. उदाहरणार्थ, बालासन योगाच्या आसनात तुम्हाला फायदे मिळू शकतात. अधो मुख शवासन, प्रसरिता पदोत्तानासन आणि हस्तपादासन यांसारख्या आसनांच्या सरावानेही अशा समस्यांमध्ये फायदा मिळू शकतो.

मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सर्व प्रयत्न करूनही जर तुमची मायग्रेनची समस्या बरी होत नसेल, तर तुम्ही या समस्येबाबत मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मायग्रेनची समस्या टाळण्यासाठी योगासनासोबतच डॉक्टरांनी सुचवलेली औषधे घेत राहणे आवश्यक मानले जाते. मायग्रेनला चालना देणारी परिस्थिती टाळणे आवश्यक मानले जाते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI