एक गोळी कोरोनावर गुणकारी, पाच दिवसांचा कोर्स 1399 रुपयांमध्ये; नवी गोळी मार्केटमध्ये दाखल

एक गोळी कोरोनावर गुणकारी, पाच दिवसांचा कोर्स  1399 रुपयांमध्ये; नवी गोळी मार्केटमध्ये दाखल
प्रातिनिधिक फोटो

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी युद्ध पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. बहुमूल्य मानवी जीवन वाचविण्यासाठी अनेक औषधी निर्माण कंपन्या मधील शास्त्रज्ञ रात्रंदिवस एक करत आहेत. कोरोना विरोधात बाजारामध्ये अनेक लस उपलब्ध झाल्या आहेत. लोकांनी एक किंवा दोन लसीचे डोस सुद्धा घेतलेले आहे. कोरोना चे वाढते संक्रमण ओळखून कंपन्यांनी आता स्वस्त आणि सहज सोयीची  गोळी उपलब्ध करून दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 04, 2022 | 12:27 PM

नवी दिल्ली: Molnupiravir या गोळीला भारतामध्ये कोविंड विरोधात आपात्कालीन स्थितीमध्ये मान्यता देण्यात आली. सौम्य ते प्रभावी कोविड संक्रमणाविरोधात या गोळीचा वापर करता येणार आहे. सोमवारी ही गोळी भारतीय बाजारात उपलब्ध करून देण्यात आली. एका गोळी ची किंमत 1,399 रुपये आहे. ही गोळी पाच दिवसांच्या कोर्स साठी तयार करण्यात आलेली आहे. कोरोना संक्रमणा विरोधात आतापर्यंतचे हे सर्वात स्वस्त औषध मानल्या जात आहे. 800 ग्रॅमची ही गोळी दिवसातून दोन वेळा पाच दिवसांसाठी घ्यावी लागणार आहे.

औषध तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा

आतापर्यंत कोरोनाविरोधातील संशोधनात शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी खूप मोठी मजल मारली असून अनेक औषधी कंपन्यांच्या लस बाजारात उपलब्ध आहेत.  तर काही औषधी कंपन्या कोरोना विरोधात गोळी अथवा द्रवरूपात औषध तयार करून तोंडावाटे त्याचा वापर वाढवण्यावर भर देत आहेत. त्यांच्या संशोधनाला ही लवकरच यश मिळेल. या कंपन्यांमध्ये Hetro, Sun Pharma, Natco, Dr Reddy या कंपन्यांचा समावेश आहे. तोंडावाटे औषध तयार करण्याची जबाबदारी या कंपन्यांनी पेलली आहे. Merck या कंपनीने त्यांची सहभागीदार Ridgeback सोबत तोंडावाटे औषध तयार करण्याच्या प्रक्रियेला गती दिली असून लवकरच या कंपन्यांचे औषध बाजारात उपलब्ध होईल 1500  ते 2500 रुपये यादरम्यान या संपूर्ण औषध किटची किंमत असेल.

गोळी ठरणार गेम चेंजर

या नवीन संशोधनामुळे विरोधातील लढाईला मोठे बळ मिळणार आहे. संसर्गजन्य आजारा विरोधातील मोहिमेमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने औषध मिळण्याच्या या प्रक्रियेमुळे हा लढा तीव्र करता येईल. या गोळ्यांचा खर्च सर्वसामान्यांच्या आटोक्यात आल्यामुळे कोरोनामुळे तयार भीतीचे वातावरण निवळण्यात बऱ्याच अंशी यश मिळेल.  प्राथमिक स्वरूपातील हे प्रयोग कोरोना मुळे बाधित होणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरतील.

अजून दोन कंपन्या मैदानामध्ये

Mankind Pharma या कंपनीने सहभागीदार  BDR Pharma यांच्यासोबत संशोधन करत तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या गोळी ची निर्मिती केली आहे. या गोळीचे नाव Molulife (200 mg) असे असून दिल्ली आणि उत्तर भारतातील काही शहरांमध्ये ही गोळी संक्रमण ग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर Sun Pharma या औषध क्षेत्रातील नामवंत कंपनीने MolxVir हे कोरणा विरोधातील प्रभावी गोळी तयार केली असून ती 1500 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

इतर बातम्या: 

Mera Ration : एका क्लिकवर बदला रेशन दुकान, मेरा रेशन ॲप स्थलांतरितांसाठी फायदेशीर

Jalgaon| भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस; पात्रतेबाबत काय होणार निर्णय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें