AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monkeypox Diet: ‘मंकीपॉक्स’ टाळण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश; लवकर बरे व्हाल!

Monkeypox Diet: भारतातही मंकीपॉक्सची प्रकरणे वाढू लागली आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही, काही निवडक खाद्यपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. हे खाद्यपदार्थ तुम्‍हाला रोगप्रतिकारशक्ती वेगाने वाढवून मंकीपॉक्‍स पासून दूर राहण्यास मदत करेल.  

Monkeypox Diet: ‘मंकीपॉक्स’ टाळण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश; लवकर बरे व्हाल!
Monkeypox DietImage Credit source: google
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 1:48 PM
Share

मंकीपॉक्स या घातक विषाणूंची (dangerous viruses) लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. भारतातही या विषाणूंची संख्या वाढू लागली आहे. देशाची राजधानी दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. ज्याला आरोग्य मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. दिल्लीतील मंकीपॉक्सची ही पहिलीच केस असू शकते, पण भारतात आतापर्यंत 4 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. इतर तीन केसेस केरळ राज्यातील आहेत. मंकीपॉक्सच्या लक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, कांजण्यांप्रमाणे त्वचेवर पुरळ (Skin rash) उठू लागते. उच्च ताप हे देखील रुग्णांचे लक्षण असल्याचे मानले जाते. भारतातही मंकीपॉक्सची प्रकरणे वाढू लागली आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही, काही निवडक खाद्यपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. हे खाद्यपदार्थ तुम्‍हाला रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वेगाने वाढवून मंकीपॉक्‍स पासून दूर राहण्यास मदत करेल. जाणून घ्या, कोणता आहार तुम्हाला मंकीपॉक्स पासून वाचवू शकतो.

 व्हिटॅमिन सी

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर, कोणताही आजार तुमच्यापासून दूर राहतो हे निश्चित. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आहे. ते, मंकीपॉक्सवर मोठ्या प्रमाणात मात करू शकतात. मात्र, याचा कोणताही पुरावा नाही. व्हिटॅमिन सी द्वारे तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आहारात लिंबू आणि लिंबू वर्गीय आंबट पदार्थाचा समावेश करू शकता. जर तुम्हाला ते आवडत नसेल तर पपईसह इतर गोड फळे खा. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल.

 तुळशीची पाने

आयुर्वेदात तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. कारण, ते औषधाचे काम करतात. असे मानले जाते की तुळशीच्या पानांपासून बनवलेले पाणी रुग्णाला दिल्यास तो लवकर बरा होतो. ज्यांना हा आजार जडलेला नाही, त्यांनी रोज तुळशीच्या पानांपासून बनवलेला काढाही प्यावा. ते तुम्हाला आतून मजबूत बनवेल.

 पुदीना (मिंट)

जेवणाची चव वाढवण्यासाठी पुदिन्याचा वापर औषध म्हणूनही केला जातो. हे अनेक रोगांवर उपचार मानले जाते. विशेषतः पोटदुखीमध्ये त्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. यापासून बनवलेल्या वस्तू खाल्ल्याने स्नायूंमधील ताण दूर होतो. यासोबतच अस्थमा सारख्या गंभीर आजारांपासूनही ते तुमचे रक्षण करते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पुदिन्याचा हर्बल चहा पिऊ शकता, ज्यामुळे तुमची खोकल्याची समस्या दूर होऊ शकते.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.