योगा करतांना कधीच करू नका ‘या’ चुका.. होऊ शकते तुमच्या शरीराचे मोठे नुकसान; जाणून घ्या, योगा करतांना काय काळजी घ्यावी!

शरीरासह मन शांत ठेवण्यासाठी योग ही एक उत्तम कला आहे. यामुळेच लोकांना योगाची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा केला जातो. परंतु, योगासन करतांना काही लोक चुका करतात त्या चुका तुमच्या शरीरासाठी हाणीकारक ठरू शकतात.

योगा करतांना कधीच करू नका ‘या’ चुका.. होऊ शकते तुमच्या शरीराचे मोठे नुकसान; जाणून घ्या, योगा करतांना काय काळजी घ्यावी!
योगासणेImage Credit source: unsplash.com
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 4:40 PM

माणसाच्या निरोगी जीवनात योगाचे खूप महत्त्व आहे. योगा केल्याने केवळ हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी (Reducing the risk of diseases) होत नाही, तर तुमच्या शरीराचे संपूर्ण आरोग्यही चांगले राहते. यासोबतच मन शांत ठेवण्यासाठी योग ही एक उत्तम कला आहे. यामुळेच लोकांना योगाची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो. 2015 पासून योगदिन साजरा केला जात असून, या दिवशी लोकांमध्ये योगासने करतांना एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. नित्यनियमाने योगासन (Yogasana on a regular basis) करणारे तर असताच परंतु, यादिवशी योगा करणाऱयांची संख्या कीतीतरी पटीने अधिक असते. योगासने शरीरासाठी उत्तम असली तरी, योगाअभ्यास हा शास्त्रयुक्त पद्धतीनेच (In a scientific way) केला पाहीजे. अन्यथा त्याचे काही तोटेही होऊ शकतात. योगा करतांना, लोक अशा अनेक चुका करतात ज्या जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत.

योगासना पूर्वी खाणे

असे बरेच लोक आहेत जे योगसन करण्यापूर्वी काहीतरी खाऊनच योगा करतात. परंतु, योगासनांच्या २-३ तास आधी काहीही खाणे टाळा, असे तज्ज्ञांचे मत आहे. अन्न खाल्ल्यानंतर योगा केल्याने शरीरात गाठींचा त्रास होवु शकतो. याशिवाय मळमळ किंवा उलट्या होण्याच्या तक्रारीही समोर येऊ शकतात. खरे तर पोटातील अन्न इतक्या लवकर पचत नाही. यामुळे योगासने करताना उलट्या होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

योग प्रशिक्षकापासून दुखापत लपवू नका

तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम किंवा जखमा असल्यास किंवा योगा करतांना कोणत्याही आसनात तुम्हाला त्रास होत असेल तर, लगेच त्याबद्दल तुमच्या प्रशिक्षकाला सांगा. दुर्लक्ष केल्यास अशा गोष्टी तुमच्यासाठी मोठा धोका निर्माण करू शकतात.

मोबाईल फोन दूर ठेवा

स्मार्टफोनचे व्यसन माणसासाठी अत्यंत घातक ठरु शकते. काही लोक मोबाईल फोन घेऊन योगाचे वर्गात हजेरी लावतात. योगासनाच्या वेळी तुमचे लक्ष नेहमी आसनावर असावे. योग करताना मोबाईल फोनसारख्या गोष्टी तुमचे लक्ष विचलित करू शकतात.

टॉवेल सेाबत असु द्यावे

योगा करताना थकव्यामुळे तुम्हाला घाम येतो, त्यामुळे योगा वर्गात टॉवेल किंवा रुमाल सोबत आणायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला घाम आला की घाम साफ करता येईल.

उत्साहात योग करू नका

घाई किंवा उत्साहात केलेले काम नेहमी नुकसानास कारणीभूत ठरते. उत्साहात कोणताही योग न करणे ही योगाची महत्त्वाची अट आहे. योगाभ्यासाची चुकीची मुद्रा किंवा आसन तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते.

वॉर्म-अप करायला विसरू नका

जर तुम्ही वर्गात जाताच योगासने करायला सुरुवात केली. तर, असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. योगा करण्यापूर्वी शरिराला तयार करणे अर्थात 10 मिनिटांचा वॉर्म-अप करा. वॉर्म अप केल्याने शरीराला इजा होण्याची शक्यता कमी होते. योगासन करतांना काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजे जेणेकरून तुमच्या शरिराला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही याबाबत आजतक हिंदीने सविस्तर वृत्त प्रसारीत केले आहे.

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.