Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच, कोरोनाबळींचा आकडाही घसरला

गेल्या 24 तासात भारतात 32 हजार 937 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 417 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 35 हजार 909 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच, कोरोनाबळींचा आकडाही घसरला
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 10:30 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 4 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात 32 हजार 937 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 417 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या सध्या चार लाखांच्या खालीच आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 32 हजार 937 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 417 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 35 हजार 909 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 22 लाख 25 हजार 513 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 11 हजार 924 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 31 हजार 642 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 81 हजार 947 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 54 कोटी 58 लाख 57 हजार 108 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 32,937

देशात 24 तासात डिस्चार्ज – 35,909

देशात 24 तासात मृत्यू – 417

एकूण रूग्ण – 3,22,25,513

एकूण डिस्चार्ज – 3,14,11,924

एकूण मृत्यू – 4,31,642

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,81,947

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 54,58,57,108

गेल्या 24 तासातील लसीकरण – 17,43,114

संबंधित बातम्या :

अंबरनाथमध्ये सर्वात मोठी लसीकरण मोहीम, 30 हजार कामगारांना दिली जाणार मोफत लस

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.