AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Autism : तुमचीही मुलं रोबोटिक उच्चारात बोलताहेत? काय आहेत कारणं?; स्वमग्नतेच्या विळख्यात तर नाही ना?

डिजिटल युगामुळे सध्याच्या पिढीमध्ये कमालीचा फरक जाणवत आहेत. ही मुलं सतत यंत्राशी खेळत असल्याने किंवा यंत्राच्या सान्निध्यात राहत असल्याने रोबोटिक बोलताना दिसत आहेत. ही लक्षणे ऑटिझमशी संबंधित आहे.

Autism : तुमचीही मुलं रोबोटिक उच्चारात बोलताहेत? काय आहेत कारणं?; स्वमग्नतेच्या विळख्यात तर नाही ना?
AutismImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 03, 2023 | 7:59 PM
Share

मुंबई : सध्याची पिढीही डिजीटल युगात वावरत आहे. ही पिढी मैदानी खेळापासून दुरावली असून मोबाईल, संगणक आणि इतर मनोरंजनमाध्यमात अडकली आहे. त्यामुळे आजकालची मुलं ही रोबोटिक उच्चारात बोलताना दिसतात. डिजिटल मीडिया, मनोरंजन माध्यमे आणि वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे अनेक मुले रोबोटिक उच्चारात बोलू लागली आहेत. हा मेकॅनिकल म्हणजेच यंत्रवत ध्वनी एकसूरी असतो आणि हे स्वमग्नतेचे सुरुवातीचे लक्षण असू शकते, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

वर्ल्ड ऑटिझम डे म्हणजे जागतिक स्वमग्नता दिवस काल साजरा झाला. या निमित्ताने डिजिटल युग आणि आजची पिढी यावर तज्ज्ञांनी धक्कादायक माहिती दिली आहे. डिजिटल युगामुळे मुलांमध्ये होणाऱ्या बदलांवर प्रकाश टाकला आहे. मुलांना या प्रकारच्या कंटेन्टचा फक्त मौखिक भागच कळतो. मुलाच्या बाजूने विचार करता त्याला/तिला त्या कंटेन्टमधील छुप्या किंवा अमौखिक भावना समजत नाहीत. परिणामकारक संभाषणाच्या माध्यमातून संदेश देण्यासाठी हेतू हा शब्दांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. जर संभाषणातून हेतू समजला नाही तर चुकीचा संदेश जाऊ शकतो किंवा गैरसमज होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

स्वमग्नतेचा संबंध वाणीशी

स्वमग्नता हा मेंदूशी संबंधित आजार आहे. या आजारात विशिष्ट हालचाली होतात, संभाषण व सामाजिक संवादाचा अभाव असतो. स्वमग्नतेचा मुलाच्या वाणीशी संबंध आहे. कारण स्वमग्नतेत संवादावर परिणाम झालेला आहे. स्वमग्न मुलाशी पालकांच्या असलेल्या संवादावर परिणाम झालेला असल्याने ते मूल गॅजेट्स, डिव्हाइसेस आणि टीव्हीशी तुलनेने जास्त जोडलेले असते.

जेव्हा मूल अनुकरणा करण्याच्या वयात पोहोचते तेव्हा स्वमग्न मूल पालक व मुलांमधील घट्ट नात्याच्या अभावी, मूल डिजिटल मीडिया उच्चारांना प्राधान्य देते. स्वमग्न असलेल्या काही मुलांमध्ये रोबोटिक उच्चार दिसून येऊ शकतात. अर्थात, हे पूर्ण निदान होऊ शकत नाही. त्यामुळे स्वमग्न असलेले मूल आजूबाजूच्या वातावरणाशी (पालकही या वातावरणचा भाग असतात) जोडले जात नाही. कारण सोशल इंटरॅक्शनचा अभाव असतो. त्यामुळे मुलाकडून स्क्रीन टाइम कंटेन्टचे अनुसरण केले जाण्याची शक्यता जास्त असते.

तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा

ऐकण्याशी संबंधित विकार असलेली जी मुले वयाच्या दुसऱ्या वर्षी रोबोटिक उच्चार करतात ते स्वमग्नतेची सुरुवातीची लक्षणे दर्शवत असतात. जर मूल परिणामकारकपणे संवाद साधू शकत नसेल आणि त्याचे उच्चार यंत्रवत असतील तर पालकांनी डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे, असं डॉ. सुमीत शिंदे यांनी म्हटलं आहे.

10 पैकी 8 मुले स्वमग्नतेच्या कक्षात

चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरमधील वरिष्ठ सल्लागारांच्या म्हणण्यानुसार, ते दररोज तपासणी करत असलेल्या दर 10 मुलांपैकी 8 मुले स्वमग्नतेच्या कक्षेत असतात. गेल्या दशकभरात स्वमग्न मुलांच्या संख्येत खूप वाढ झाली आहे आणि पालकांना संभाषणासंदर्भातील आजारांच्या संकेतांची जाणीव असणे आवश्यक आहे. पालक-मुलांमध्ये अधिकाधिक संवाद होणे आणि स्क्रीन टाइम कमी असणे गरेजेचे आहे, जेणेकरून मुले अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतील. रोबोटिक उच्चार व संवादासंबंधीचे विकार वेळीच ओळखून पालकांनी लगेच पावले उचलणे गरजेचे आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.