Post Pregnancy Care: C- Section नंतर निरोगी आरोग्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो, जाणून घ्या तज्ञांचे मत….
Post C- Section Care: सी सेक्शन शस्त्रक्रियेनंतर महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आहार आणि जीवनशैली योग्यरित्या राखली पाहिजे. सी सेक्शन नंतर आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल तज्ञांनी सांगितले आहे.

प्रेग्नेंसी प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. या काळामध्ये महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु अनेकवेळा काही कॉंप्लिकेशनमुळे सी सेक्शन शस्त्रक्रिया केली जाते. सी सेक्शन शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेनी तिच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या काळामध्ये योग्य काळजी नाही घेतल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. प्रेग्नेंसीनंतर महिलेच्या शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे चिडचिड होणे, डिप्रेशन येणे, गोष्टी विसरणे आणि थकवा येणे यांच्या सारख्या समस्या उद्भवतात.
सी सेक्शन नंतर महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. योग्य पोषक पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करणे गरजेचे असते. सी सेक्शन नंतर खाण्यापिण्यापासून ते योग्य वेळी चालण्यापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमची छोटीशी चुक तुमचं आरोग्य बिघडून त्याच्यावर गंभीर परिणाम करू शकते. सी सेक्शन झाल्यानंतर जास्त व्यायाम करू नये यामुळे तुमच्या पोटावर भार येऊ शकतो. चला तर जाणून घेऊया सी सेक्शन नंतर आरोग्याची काळजी कशी घ्यावी? तज्ञांचे यावर काय मत आहे.
सी सेक्शनच्या सुमारे 6 महिन्यांनंतरच वजन कमी करण्याचे नियोजन करावे. यासाठी दैनंदिन व्यायामासोबतच आहाराचीही काळजी घ्यावी लागते. बाळंतपणानंतर 88 आठवडे वजन कमी करू नका किंवा क्रॅश डाएटिंग करू नका. असे केल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. सी सेक्शन नंतर आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वे समाविष्ट करणे महत्वाचे आहे. कारण प्रेग्नेंसीनंतर महिलांचे शरीर कमकुवत होते.




बाळाला स्तनपान देण्यासाठी चांगला आहार खाणे आवश्यक आहे. असे नाही केले तर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. सी सेक्शननंतर महिलांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. आहारात दूध, दही, मांस, मासे, अंडी आणि सुकामेवा यांचा समावेश करावा. याशिवाय फळे आणि हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात खा. बाळंतपणानंतर शरीरात व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमची खूप गरज असते. यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही काही आठवड्यांनी दूध घेऊ शकता, परंतु बद्धकोष्ठता निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळा.
सी सेक्शन डिलिव्हरीनंतर, महिलांनी फास्ट फूड आणि पिझ्झा, बर्गर, चाउमीन सारख्या जंक फूडपासून दूर राहावे. रिफाइंड पिठापासून बनवलेल्या इतर गोष्टी खाणे देखील टाळावे. बाळंतपणानंतर कमीत कमी 6 महिने व्यायाम करणे टाळा. फक्त हलके चालणे किंवा धावणे करा, चुकूनही जास्त व्यायाम करू नका. ध्यान नक्की करा. जर काही समस्या येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यासोबतच जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन टाळा.