धक्कादायक, औरंगाबादमध्ये कोरोना झाल्यानंतर महिलेच्या शरीरात पू भरला; भारतातील पहिलीच घटना

कोरोना झाल्यावर त्याचा शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम होत असल्याचं आतापर्यंत आढळून आलं आहे. (Pus forms inside woman's entire body, first such case of COVID side-effect in India)

धक्कादायक, औरंगाबादमध्ये कोरोना झाल्यानंतर महिलेच्या शरीरात पू भरला; भारतातील पहिलीच घटना
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 7:54 AM

औरंगाबाद: कोरोना झाल्यावर त्याचा शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम होत असल्याचं आतापर्यंत आढळून आलं आहे. पण कोरोना झाल्यानंतर एका महिलेच्या शरीरात पू निर्माण झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. या विचित्र घटनेमुळे वैद्यकीय यंत्रणाही हैराण झाली असून या महिलेवर तातडीने उपचार करण्यात आले. कोरोना झाल्यावर शरीरात पू भरण्याच्या जगात सहा घटना समोर आल्या आहेत. तर भारतातील ही पहिलीच घटना असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. (Pus forms inside woman’s entire body, first such case of COVID side-effect in India)

औरंगाबाद येथील मध्यवर्ती ठिकाणी राहणाऱ्या या महिलेची आणि तिच्या निवासाची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने आणि पाय दुखू लागल्याने तिला 28 नोव्हेंबर रोजी हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना या महिलेच्या शरीरात पू भरल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आल्याने सर्वांना एकच धक्का बसला. तिचा एमआयआर काढण्यात आल्याने त्यात तिच्या शरीरात प्रचंड प्रमाणात पू निर्माण झाल्याचं आढळून आलं. कोरोना झाल्यानंतर शरीरात पू भरण्याची ही भारतातील पहिलीच घटना असल्याने या महिलेवर उपचार करणं डॉक्टरांसाठीही मोठं आव्हान होतं. त्यामुळे डॉक्टरांनी या महिलेवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करून तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले आणि या आव्हानावर मात करण्यात यशही मिळविलं. डॉ. श्रीकांत दहिभाते यांनी या महिलेवर यशस्वी उपचार केले. सध्या या महिलेची प्रकृती ठणठणीत असून आता तिला कोणतेही साईड इफेक्ट जाणवत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

अर्धा लिटर पू काढला

डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर तातडीने उपचार करताना तिच्या शरीरातून सुमारे अर्धा लिटर पू काढला. ही महिला पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला 21 डिसेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जर्मनीत सहा घटना

कोरोनाची लागण झाल्यानंतर शरीरात पू भरण्याच्या जर्मनीत सहा केसेस आढळून आल्या आहेत. अशा केसेसमध्ये रुग्णाची अँटीजेन टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह येतो, पण त्याच्या शरीरात अँटीबॉडीज असतात असं सूत्रांनी सांगितलं. (Pus forms inside woman’s entire body, first such case of COVID side-effect in India)

संबंधित बातम्या:

लंडनवरुन 10 जण रत्नागिरीत, अख्खं कोकण टेन्शनमध्ये

ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी एक घातक अवतार, वेगवान संसर्गामुळे खळबळ

नव्या कोरोनाचा धसका; संपूर्ण 2021पर्यंत मास्क, सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक: डॉ. संजय ओक

(Pus forms inside woman’s entire body, first such case of COVID side-effect in India)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.