खोकल्याचा आवाज ऐकून अ‍ॅप सांगणार आजार; अमेरिकन संशोधकांनी शोधलं नवा अ‍ॅप!

अमेरिकन संशोधकांनी एक वेगळ्या प्रकारचा अ‍ॅप विकसित केला आहे. नुसतं खोकल्यावर समोरच्या व्यक्तिला कोणता आजार आहे हे हा अ‍ॅप सांगतो. (Scientists are developing an app that uses to diagnose what disease a person)

खोकल्याचा आवाज ऐकून अ‍ॅप सांगणार आजार; अमेरिकन संशोधकांनी शोधलं नवा अ‍ॅप!
cough
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 7:36 AM

नवी दिल्ली: अमेरिकन संशोधकांनी एक वेगळ्या प्रकारचा अ‍ॅप विकसित केला आहे. नुसतं खोकल्यावर समोरच्या व्यक्तिला कोणता आजार आहे हे हा अ‍ॅप सांगतो. या अ‍ॅपद्वारे आजाराचं अचूक निदान व्हावं म्हणून वेगवेगळ्या आजाराने झुंजणाऱ्या लाखो लोकांच्या खोकण्याचा आवाज या अ‍ॅपमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती खोकल्यास अ‍ॅपमधील रेकॉर्ड आवाजाशी हा आवाज जुळवला जातो आणि त्यातून आजाराचं निदान केलं जात असल्याचं सांगण्यात येतं. (Scientists are developing an app that uses to diagnose what disease a person)

आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे हे आवाज समोरच्या व्यक्तीला काय आजार आहे हे सांगतो. भविष्यात दमा, न्यूमोनिया किंवा कोरोनासारखे आजार झाल्यावर रुग्णाची स्थिती किती गंभीर आहे हे सुद्धा समजू शकणार आहे.

तंतोतंत माहिती मिळणार

मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि टीबी एक्सपर्ट डॉ. पीटर स्माल या अ‍ॅप बनविणाऱ्या कंपनीच्या प्रमुख आहेत. वेगवेगळ्या आजारात खोकण्याचे आवाजही बदलतात. दमा असलेला व्यक्ती खोकला तर त्याच्या खोकण्यात आणि श्वास घेण्यात घरघर असा आवाज येतो. तर न्यूमोनिया झालेल्या रुग्णाच्या फुफ्फुसातून वेगळ्याच प्रकारचा आवाज येतो, असं पीटर स्माल यांनी सांगितलं. अ‍ॅपमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगवेगळ्या प्रकारच्या खोकल्याच्या आवाजाचा पॅटर्न समजतो. लोकांना जे आजार माहीत पडत नाहीत, असे आवाज हे अ‍ॅप खोकल्याचा आवाज ऐकून सांगतात.

औषध आणि डॉक्टरांपेक्षाही वेगवान निदान

जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे येतो तेव्हा दिवसातून किती वेळा खोकला येतो हे तो सांगतो. फुफ्फुसाच्या रोगावरील तज्ज्ञ डॉक्टर या आजाराचं निदान त्वरीत करू शकतात. हा अ‍ॅप सुद्धा त्याच पद्धतीने काम करतो. तसेच डॉक्टरांपेक्षा वेगाने रिझल्ट देतो. त्यामुळे तुमचा वेळ आणि डॉक्टरांना दिली जाणारी फी सुद्धा वाचते, असं डॉक्टर स्माल यांनी सांगितलं.

स्पेनमध्ये अभ्यास सुरू

स्पेनमध्ये हा अभ्यास सुरू आहे. मोबाईलमध्ये हा अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आला आहे. मोठा आणि वेगाने आवाज आल्यावर अ‍ॅप कसा रिअ‍ॅक्ट करतो हे पाहिलं जात आहे. याचा तपास सुरू आहे. ट्रायल पूर्ण झाल्यावरच अ‍ॅपच नवा जाहीर केलं जाणार असून लोकांना तो उपलब्ध होणार आहे.

खोकला का येतो?

श्वसन नलिकेत काही तरी अडचण निर्माण झाल्यावर खोकला येतो. बॉडीचा नर्व मेंदू मेसेज पाठवतो. मेंदू पुन्हा मसल्सला सिग्नल देऊन फुफ्फुसात हवा भरते आणि पोट आणि छाती फुगते. असं झाल्यावर खोकला येतो आणि व्यक्तीला दिलासा मिळतो. (Scientists are developing an app that uses to diagnose what disease a person)

संबंधित बातम्या:

Stevia Benefits : मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी चहामध्ये साखरेऐवजी स्टीविया वनस्पतीचा समावेश करा! वाचा अधिक!

Home Remedies for Stone: ‘या’ 5 घरगुती उपायांनी किडनी स्टोनची समस्या दूर करू शकता!

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये सलग चौथ्या दिवशी वाढ, सक्रिय रुग्णसंख्येत मात्र घट

(Scientists are developing an app that uses to diagnose what disease a person)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.