AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकाली म्हातारे व्हाल… फक्त ऑफिसमधील ही गोष्ट टाळा

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की जर तुम्ही दररोज साडेआठ तासांपेक्षा जास्त वेळ सतत बसत असाल तर याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

अकाली म्हातारे व्हाल... फक्त ऑफिसमधील ही गोष्ट टाळा
office workImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 06, 2024 | 7:09 PM
Share

एका जागेवरच बसून काम करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की जर तुम्ही दररोज साडेआठ तासांपेक्षा जास्त वेळ सतत बसत असाल तर याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. घरात, ऑफिसमध्ये किंवा प्रवास करताना सतत बसून राहणे हे शारीरिक दृष्ट्या हानिकारक तर आहेच पण यामुळे अकाली वृद्धत्वही येऊ शकते.

जास्त वेळ बसल्याने हृदयाच्या समस्या आणि चयापचय रोगांचा धोका देखील वाढू शकतो. या संशोधनात सहभागी असलेल्यांनी दररोज सरासरी नऊ तास बसण्याचा विक्रम केला. त्यानंतर त्यांना शारीरिक हालचालींसाठी फक्त 80 ते 160 मिनिटे वेळ मिळाला. व्यायाम करून बसण्याचे वाईट परिणाम काही प्रमाणात कमी करता येतात असे या संशोधनातून समोर आले आहे. दिवसातून वीस मिनिटे चालणे किंवा शारीरिक हालचाल केली तरी देखील बसण्यामुळे झालेले नुकसान ते कमी करू शकत नाही.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही 30 मिनिटे धावणे किंवा सायकल चालवण्यासारखे व्यायाम केले तर तुमचे आरोग्य सुधारू शकते. पण बराच वेळ बसण्याचे परिणाम पूर्णपणे टाळता येत नाहीत. या संशोधनामध्ये साधारण 33 वर्षे वय असलेल्या एक हजाराहून अधिक लोकांचा समावेश होता. ज्यात 730 जुळ्या मुलांचा समावेश होता. दीर्घकाळ बसून राहण्याचा शरीरावर विशेषतः कोलेस्ट्रॉल आणि बॉडी मास इंडेक्सवर काय परिणाम होतो हे शोधणे या संशोधनाचा मुख्य उद्देश होता.

या अभ्यासातून असे समजले आहे की, जे लोक दिवसातील साडे आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसतात आणि शारीरिक हालचालींसाठी कमी वेळ घालवतात. त्यांचे कॉलेस्ट्रॉल आणि BMI चांगले नाही. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कामाच्या दरम्यान नियमित विश्रांती घेणे आणि शारीरिक क्रिया कलाप वाढवणे महत्त्वाचे आहे. कामानंतर थोडेसे चालत गेल्याने आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही.

अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डरचे मानसशास्त्र आणि न्यूरो सायन्स विभागातील प्राध्यापक चंद्र रेनॉल्ड्स यांनी सांगितले की, दिवसभर कमी बसणे, जास्त व्यायाम करणे या दोन्ही गोष्टिंमुळे अकाली वृद्धत्वाचा धोका कमी होतो. जे लोक नियमितपणे व्यायाम करतात जसे की तीस मिनिटे धावणे किंवा सायकल चालवणे त्यांच्यात कोलेस्ट्रॉल आणि बीएमआय मोजमाप ते पाच ते दहा वर्षे लहान दिसतात. जास्त वेळ बसल्याने होणारी हानी टाळण्यासाठी अधिक शारीरिक हालचालींची गरज आहे.

Follow Us
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला