AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ती’ एक सवय ठरू शकते घातक ; तुम्हालाही आहे का ही जीवघेणी सवय ?

Lack Of Sleep : तुम्हालाही रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय असेल तर ती अतिशय घातक ठरू शकते.

'ती' एक सवय ठरू शकते घातक ; तुम्हालाही आहे का ही जीवघेणी सवय ?
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 20, 2023 | 6:23 PM
Share

Sleeping problems : लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे…. लहानपणी आपण सर्वांनीच ही म्हण ऐकली असेल. रात्री लवकर झोपून (sleep early) सकाळी लवकर उठल्याने चांगले आरोग्य मिळते असा त्याचा मतितार्थ… मात्र आजकाल सगळंच बदललं आहे. धावपळीच्या युगात सगळ्यांचे रूटीन बिघडलेले असते. त्यातही बऱ्याच जणांचे आयुष्य त्यांच्या स्मार्टफोनने (smartphone) व्यापलेले असते. लोक रात्रभर मोबाईलवर काम करत, पिक्चर बघत नाहीतर सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत घालवतात.

यामुळे त्यांना रात्री वेळेवर झोप येत नाही. पण असे केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय माणसाला मृत्यूच्या जवळ घेऊन जाते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. झोपेच्या कमतरतेचा शरीरावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे अनेक आजार होण्याचा धोकाही असतो. या आजारांमुळे वृद्धापकाळात मृत्यू होतो.

हा अभ्यास फिनलंडमधील फिनिश इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ येथे करण्यात आला आहे. ‘क्रोनोबायोलॉजी इंटरनॅशनल’मध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने शरीरात अनेक आजार निर्माण होतात, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कमी वयात मृत्यू होण्याचा धोका असतो. या अभ्यासात 23,000 लोकांवर संशोधन करण्यात आले.

22 वर्ष करण्यात आला अभ्यास

1980 ते 2022 या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी सुमारे 9 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. अकाली मरण पावलेले हे सर्व लोक रात्री उशिरापर्यंत जागे असायचे. तर दुसरीकडे, जे लोक रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठायचे त्यांना मृत्यूचा धोका 10 टक्के कमी होता, असेही दिसून आले. मात्र रात्री उशीरापर्यंत जागणे, दारू पिणे, धूम्रपान न करणे अशा घातक सवयी असलेल्या लोकांचा तरुण वयात मृत्यू होण्या धोका सर्वाधिक असल्याचेही त्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

रात्री उशीरापर्यंत जागल्यास अनेक आजारांचा धोका

फिनिश संस्थेतील या अभ्यासाच्या लेखकाने सांगितले की, जी लोकं रात्री उशिरापर्यंत जागतात त्यांना हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर तसेच मधुमेह यांसारखे अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. रात्री उशिरापर्यंत जागे राहणारे लोक लहान वयातच या आजारांना बळी पडतात. भविष्यात हे आजार मृत्यूचे कारण बनू शकतात. अशा परिस्थितीत लोकांनी झोपण्याच्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय प्रत्येक व्यक्तीने अंगिकारली पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीने दररोज कमीत कमी आठ तासांची झोप घेतली पाहिजे.

Follow Us
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!