AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर तुम्ही 13 वर्ष अधिक जगू शकाल, वेळीच हे बदल करा

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा आदींचा समावेश केल्यास याचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. विशेषत: मांसाहार करत असलेल्यांनी आपल्या रोजच्या आहारात काही बदल करणे गरजेचे आहे.

... तर तुम्ही 13 वर्ष अधिक जगू शकाल, वेळीच हे बदल करा
fruits-vegetables
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 1:45 PM
Share

‘आरोग्यम्‌ धन संपदा…’ असे आपण म्हणत असतो. कोरोना काळापासून आपल्याला आरोग्याचे महत्व अधिक समजले आहे. आपले आरोग्य (Health) निरोगी व सृदृढ राहण्यासाठी अनेक जण अगदी जागृक असतात. सकाळी वेळेत उठणे, व्यायाम, योगा विविध आसणे करणे, रात्री लवकर झोपणे, शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपणे आवश्‍यक ते सर्व करीत असतो. आपण बाह्य शारीरिक क्रियाकलापांव्दारे आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करीत असलो तरी सर्वाधिक दुर्लक्ष होते ते आपल्या रोजच्या आहाराकडे… धावत्या जीवनपध्दतीमुळे (Lifestyle) आपला आहार (Diet) कसा असावा, याकडे आपले नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. यामुळे याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. असे अनेक घटक आहेत जे, आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात अपायकारक ठरतात, परंतु योग्य माहितीच्या अभावी आपण त्याचे सेवक करत राहतो. ज्या वेळी आपल्याला एखादी व्याधी जडते, तेव्हा आपण आपला डाएट प्लान तयार करत असतो. परंतु तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो.

प्रक्रिया केलेले अन्न टाळा

पाश्‍चिमात्य देशांमध्ये सकस आहाराला कायमच बगल दिली जात असते. लाल मांस, प्रक्रिया केलेले मास, फास्टफूड याचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकार आदी विविध आजारांना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे एका ठराविक मर्यादेत कुठल्याही गोष्टीचे सेवन केल्यास त्याचे शरीराला फायदे होतात. आजकालच्या आधुनिक जीवनात फास्टफूड व प्रक्रिया केलेल्या मृत अन्नाला अधिक सेवन केले जात असल्याने याचा परिणाम आरोग्यावर होत असतो.

पालेभाज्यांचा समावेश करावा

आपल्या रोजच्या आहारात पालेभाज्या, संपूर्ण धान्य, नट्‌स, फळे, सुका मेवा आदींचा समावेश करावा. आपणाला फार पूर्वीपासून फळे व पालेभाज्यांचा आहारात समावेश केल्याने होत असलेल्या फायद्यांबद्दल सांगितले जाते. परंतु आपण याकडे दुर्लक्ष करीत असतो. आपल्या रोजच्या डाएटमध्ये सकस अन्न घटकांचा समावेश केल्यास यातून आपल्या शरीराला अनेक चमत्कारी फायदे मिळतात. शिवाय यातून आपण अनेक आजारांपासूनही लांब राहतो. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका अहवालानुसार लाल मांस, प्रक्रिया केलेले अन्नाचे आपल्या आहारात समावेश करत असलेल्या लोकांच्या तुलनेत जे लोक, हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा आदींचा आपल्या आहारात समावेश करतात, ते साधारणत: 13 वर्ष अधिक जगतात. वयोवृध्ददेखील सकस आहाराचा समावेश करुन अजून तीन ते चार वर्ष आपले आयुर्मान वाढवू शकता.

काय सांगतो रिपोर्ट

PLOS मेडिसिन जर्नलमध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या एक अहवालानुसार, आपल्या आहारात लाल मांस, प्रक्रिया केलेले अन्न आदींचा अतिरिक्त समावेश केल्यास यातून आपल्याला लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी विविध आजार ग्रासतात. त्या तुलनेत जर हिरव्या पालेभाज्या, फळे, नट्स, सुका मेवा, संपूर्ण धान्य आदींचा आहारात समावेश केल्यास, आपले आरोग्य चांगले राहून, दीर्घ आयुष्य लाभते. नॉर्वेमध्ये झालेल्या अभ्यासानुसार पाश्‍चिमात्य लोक आपल्या आहारात अगदीच नगन्य स्वरुपात भाज्या, फळे, धान्य आदींचा समावेश करतात, परिणामस्वरुप त्यांच्यात लठ्ठपणा, ह्रदयविकार, मधुमेह आदी समस्या दिसून येत असतात.  एका अभ्यासानुसार युरोपीयन व अमेरिकन आहाराची तुलना केली गेली आहे. रोजचा आहार व आरोग्याच्या दृष्टीकोणातून संगणकाव्दारे हा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. यानुसार, एखादी वीस वर्षीय व्यक्ती आपल्या आहारात फळे व पालेभाज्यांचा समावेश करीत असेल तर त्याचे वय साधारणत: अडीच वर्षांनी वाढते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे व फायबर असल्याने हे शरीरासाठी पोषक ठरत असते.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.