AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॉफ्ट ड्रिंक मधील ऑर्टिफि‍शियल स्‍वीटनर्स मुळे कॅन्सर होण्याचा 13% धोका , काही लोकांमध्ये रिस्क फॅक्टर दिसण्याची शक्यता अधिक!

गेल्या आठ वर्षांपासून एक संशोधन सुरू होते. या संशोधनामध्ये लोक जे आर्टिफिशियल स्वीटनर पासून तयार केलेले सॉफ्ट ड्रिंक पितात, ज्यामुळे लोकांना कॅन्सर होण्याचा 13 टक्के धोका अधिक असतो,हे संशोधनाअंती समोर आले आहे.

सॉफ्ट ड्रिंक मधील ऑर्टिफि‍शियल स्‍वीटनर्स मुळे कॅन्सर होण्याचा 13% धोका , काही लोकांमध्ये रिस्क फॅक्टर दिसण्याची शक्यता अधिक!
काही ड्रिंक्समुळे होऊ शकतो कॅन्सरImage Credit source: twitter
| Updated on: Mar 26, 2022 | 7:46 PM
Share

जर तुम्हाला सुद्धा सॉफ्ट ड्रिंक(Soft Drink) पिण्याची आवड असेल तर आत्ताच सावध व्हा.या सॉफ्ट ड्रिंक मध्ये वापरण्यात येणारे आर्टिफिशियल स्वीटनर (Artificial Sweeteners) मुळे भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका अधिकच असतो, असे नुकतेच संशोधना अंती सिद्ध झालेले आहे. हा दावा फ्रान्स मधील वैज्ञानिकांनी केलेला आहे.या वैज्ञानिकांनी 1 लाख लोकांवर एक संशोधन केले. हे संशोधन गेल्या 8 वर्षापासून सुरू आहे. या संशोधनाच्या अंती जे निष्कर्ष आले ते थक्क करणारे होते. या संशोधनामध्ये असे आढळून आले की, जे लोक सॉफ्ट ड्रिंक पितात त्या सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये जे आर्टिफिशियल स्वीटनर मिसळलेले असतात, ज्यामुळे मनुष्याच्या शरीरात कॅन्सर (Cancer) होण्याची शक्यता 13 टक्के अधिक असतो. हे संशोधन नेशनल इंस्‍टीट्यूट फॉर हेल्‍थ एंड मेडिकल रिसर्च च्या वैज्ञानिकांनी केले. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, अधिक तर सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये एस्‍पारटेम आणि एससल्‍फेम-के ऑर्टिफि‍शियल स्‍वीटनर्स चा वापर केला जातो. हे पदार्थ भविष्यात कॅन्सरला आमंत्रण देणारे ठरतात.

3,358 लोकांना झाला कॅन्सर

रिपोर्टनुसार रिसर्च पूर्ण होण्या दरम्यान 3,358 लोकांना कॅन्सर झाला,यातील 982 लोक ब्रेस्ट कॅन्सरने पीडित होते तर 403 लोकांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. 2032 लोकांना अतिलठ्ठपणामुळे कॅन्सर सारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे,असे देखील निष्कर्ष या रिसर्च दरम्यान समोर आले.

या लोकांना उद्भवू शकतो भविष्यात अधिक धोका

रिसर्च रिपोर्टनुसार ज्या लोकांच्या ड्रिंक मध्ये 79 एमजी पेक्षा जास्त आर्टिफिशियल असते त्या लोकांमध्ये कॅन्सर होण्याचा धोका 13 टक्के अधिक दिसून येतो. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, या ड्रिंक्स मध्ये एस्‍पारटेम आणि एससल्‍फेम-के सारखे ऑर्टिफि‍शियल स्‍वीटनर्स सर्वसामान्यांना शुगरच्या तुलनेत 20 टक्के जास्त गोडवा आपल्या शरीरामध्ये तयार करतात यामुळे भविष्यात आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. तसे पाहायला गेले तर केलेल्या संशोधनावर दुसर्‍या वैज्ञानिकांनी सुद्धा आपली बाजू मांडली आहे. कॅन्सर रिसर्च युके येथील सिनियर हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजर फ‍ियोना ऑस्‍गुन यांच्या मते, वैज्ञानिकांनी आर्टिफिशियल स्वीटनर आणि कॅन्सर यांच्यातील असतानी नातेसंबंध या संशोधनामध्ये दर्शवलेले आहे परंतु याचा अर्थ असा नाही की, यामुळे तुम्हाला भविष्यात कॅन्सर होऊ शकतो परंतु नागरिकांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. कोणतीही गोष्ट जर आपण अतिरिक्त सेवन केली तर त्याचा भविष्यात दुष्परिणाम होऊ शकतो म्हणूनच जर तुम्ही भविष्यात सॉफ्ट ड्रिंक वारंवार सेवन करत असाल तर याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर अवश्य होऊ शकतो म्हणूनच शक्यतो सॉफ्ट ड्रिंक कमी सेवन करण्याचा प्रयत्न करा.

Petrol Diesel नंतर आता आणखी एक फटका! पॅरासिटेमॉलसह 800 औषधं महागणार, असं नेमकं का होणार?

Health care : पचनक्रिया मजबूत करण्यासाठी हे पदार्थ खा, सर्व समस्या दूर राहतील!

Nagpur | 15 महिन्यांच्या विहानला दुर्मिळ आजार, उपचारासाठी हवंय 16 कोटींचं इंजेक्शन, Crowdfundingसाठी पालकांचे प्रयत्न

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....