AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही सुद्धा लग्नात, पार्ट्यांमध्ये करता ती चूक? मग लठ्ठपणा कसला डोंबल्याचा कमी होणार, कारण जाणून धक्का बसणार

Obesity : आजकाल लग्न आणि इतर कार्यक्रमांमध्ये बुफे जेवणाचे लोण पार खेड्या गावांपर्यंत पोहचले आहेत. आता कॅटरिंगचा व्यवसाय वाढला आहे. पण या सर्वांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तुमचे वजन वाढण्यास ही कृती पण कारणीभूत ठरते.

तुम्ही सुद्धा लग्नात, पार्ट्यांमध्ये करता ती चूक? मग लठ्ठपणा कसला डोंबल्याचा कमी होणार, कारण जाणून धक्का बसणार
लठ्ठपणा कसा कमी होईल
| Updated on: Aug 26, 2025 | 3:27 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशासमोर वजन वाढीचे, लठ्ठपणाचे मोठे संकट उभे ठाकल्याचे म्हटले आहे. त्यामागे जंक्स फुड्सच नाही तर बदलेली जीवनशैली सुद्धा कारणीभूत ठरली आहे. कमी झालेली शारिरिक हालचाल, ताणतणाव आणि झोपेचे बिघडलेले गणित यामुळे लठ्ठपणा वाढत असल्याचे समोर आले आहे. लठ्ठपणा ही केवळ शारीरिक समस्या नाही तर अनेक आजारांचे मूळ कारण आहे. त्यातच लग्न आणि इतर समारंभात बुफे जेवणाचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहेत. त्यातील ही एक चूक अनेकांच्या लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरली आहे.

ही चूक लठ्ठपणाला आमंत्रण

भारतीय संस्कृतीत जमिनीवर मांडी घालून जेवण करण्याची पद्धत आहे. त्यामुळे अन्न पचण करण्यास मदत होते. जमिनीवर बसून प्रार्थना केल्यानंतर जेवणाला सुरुवात करण्यात येते. पण आजकालच्या बुफे पद्धतीमुळे उभं राहुन जेवण करावे लागते. या पद्धतीमुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. आणि वजन वाढण्याची शक्यता बळावते.

लठ्ठपणामुळे लवकर येतो थकवा

  1. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक समस्या तयार होतात. लठ्ठ व्यक्ती कोणतेही काम केल्यानंतर लगेच थकते
  2. याशिवाय अशा व्यक्तीला लवकर धाप लागते. सांधेदुखीचा आणि आत्मविश्वास डळमळीत होण्याचा त्रास जाणवतो.
  3. तर लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकाराचा झटका आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो.
  4. फास्टफूड पदार्थ, पॅकेटबंद पदार्थ, मायक्रोवेव्हमधील अन्न आणि फ्रीजमधील शीळे अन्न हे आरोग्यासाठी उपायकारक मानल्या जाते.
  5. तर वाईट व्यसनं, रात्री उशीरा जागरण, सकाळी उशीरा उठणे, सतत बसून राहणे, व्यायामाचा अभाव, वाईट सवयींमुळे लठ्ठपणा वाढतो.

लठ्ठपणा असा घालवा

  • लठ्ठपणा घालवण्यासाठी अगोदर जीवनशैलीत मोठे बदल करणे आवश्यक आहे. सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा, सयंत जीवनशैली अंगीकार करा. व्यायामवर जोर द्या.
  • योग्य आणि सकस आहार करा. फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य आणि प्रथिने असलेल्या अन्न पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश असावा. तळलेले पदार्थ, प्रिझर्व्हर्ड पदार्थ, पेय टाळा
  • नियमित व्यायाम करा. किमान रोज 30 मिनिटे चाला अथवा धावा. सायकल चालवा. योग, प्राणायम करा. कसरत करा.
  • ताणतणाव टाळा, हास्यविनोदाकडे वळा. पुस्तक वाचण वाढवा.
  • झोपेची, सकाळी लवकर उठण्याची आणि जेवणाच्या वेळा पाळा. मोबाईल,टीव्हीत अधिक रमू नका. पुरेशी आणि गाढ झोप महत्त्वाची आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.