Health : डायबिटीस नियंत्रणात आणायचा असेल तर, जेवणानंतर करा फक्त ‘ही’ एक गोष्ट

रक्तातील साखरेची पातळी वाढून अनेक अन्य आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे डायबिटीस पेशंटनी वेळीच त्यांच्या जीवनशैलीत बदल केले पाहिजेत जेणेकरून त्यांना अन्य आजारांचा सामना करावा लागणार नाही.

Health : डायबिटीस नियंत्रणात आणायचा असेल तर, जेवणानंतर करा फक्त 'ही' एक गोष्ट
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 10:28 PM

Health : सध्याच्या काळात डायबिटीसचे पेशंट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याचं कारण म्हणजे आजकालच्या धावपळीच्या जगात टेन्शन, स्ट्रेस, खाण्यापिण्यात बदल अशा अनेक कारणांमुळे लोकांमध्ये डायबिटीसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे  डायबिटीस पेशंट पथ्य पाळत, व्यायाम करत, वेळोवेळी औषधे घेऊन डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. जर त्यांनी वेळेत या गोष्टी नाही केल्या तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढून अनेक अन्य आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे डायबिटीस पेशंटनी वेळीच त्यांच्या जीवनशैलीत बदल केले पाहिजेत जेणेकरून त्यांना अन्य आजारांचा सामना करावा लागणार नाही. तर आता आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे अन्य आजारांचा धोका निर्माण होणार नाही.

1. तुमच्या डाएटमधून या गोष्टी हटवा खाण्यापिण्याच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या डायबिटीस पेशंटसाठी योग्य नाहीत. त्यामुळे डायबिटीस पेशंटने त्यांच्या आहारातून बटाटे आणि तांदूळ काढून टाकावा. कारण या पदार्थांमध्ये कॅलरीज असतात ज्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवते आणि त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.

2. हे पदार्थ खाण्यास सुरुवात करा डायबिटीस पेशंटने नेहमी हेल्थी आहार घेतला पाहिजे. यामध्ये पालेभाज्या खूप फायदेशीर ठरतात. तसंच फ्लॉवर, बीन्स, कोबी, चिकन, मासे या पदार्थांचाही आहारात समावेश करावा. त्याचबरोबर कमी तेलात अन्न शिजवून खा नाहीतर कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.

3. जेवणानंतर हे काम जरूर करा डायबिटीस असलेल्यांनी दुपारचं आणि रात्रीचं जेवण केल्यानंतर 5 ते 10 मिनिटे दररोज चालणे आवश्यक आहे. कारण यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसंच हे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.