AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Benefits of Swimming : फिट रहायचंय! रोज करा स्वीमिंग, हृदयविकारासह अनेक आजार टाळा, अधिक जाणून घ्या…

Health Benefits of Swimming : बऱ्याच लोकांना स्वीमिंग करणे ( पोहणे) खूप आवडतं. रोज थोडा वेळ जरी स्विमिंग करणे हे शरीरासाठी फायदेशीर असून त्यामुळे व्यक्ती निरोगी आणि फिट राहते.

Health Benefits of Swimming : फिट रहायचंय! रोज करा स्वीमिंग, हृदयविकारासह अनेक आजार टाळा, अधिक जाणून घ्या...
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: social
| Updated on: Jul 25, 2022 | 1:55 PM
Share

मुंबई : Health Benefits of Swimming: बऱ्याच जणांना पोहोणे, स्विमिंग करणे (Swimming) खूप आवडते. दिवसातून थोडा वेळ जरी निळ्याशार , थंड पाण्यात पोहल्याने शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही रिलॅक्स होते. स्विमिंगचे अनेक फायदे आहेत. तो एक उत्तम व्यायामप्रकार (Exercise)आहे. स्विमिंग हे शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्यासाठीही (Mental Health) उत्तम मानले जाते. तरूण आणि मध्यमवयीन व्यक्तींनी दैनंदिन जीवनात स्विमिंगचा समावेश करणे, त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. प्रेग्नन्सीदरम्यानही स्विमिंग करण सुरक्षित समजले जाते. रोज स्विमिंग केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे हृदयविकाराचा आणि फुप्फुसांच्या आजाराचा धोकाही बऱ्याच प्रमाणात कमी होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते , दर आठवड्याला लोकांनी किमान 150 मिनिटे व्यायाम किंवा स्विमिंग केले पाहिजे. म्हणजेच दिवसातून कमीत कमी 25 ते 30 मिनिटे स्विमिंग केले पाहिजे. त्यामुळे तुमचे शरीर शेपमध्ये राहते तसेच मसल्सही मजबूत होतात. स्वीमिंगमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि त्यामुळे लवचिकताही (Flexibility) वाढते. त्यामुळे अनेक धोकादायक आजारांपासून शरीराचे रक्षण होते. फिटनेस लेव्हलमध्येही वाढ होते.

काय आहेत स्विमिंगचे फायदे ?

  1. – स्विमिंगमुळे तुमची कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टिम मजबूत होते. स्विमिंगमुळे हृदय, फुप्फुसांचे आरोग्य सुधारते. कार्डिओव्हॅस्क्युलर आजाराचा धोका कमी होतो.
  2. – स्विमिंग हा एक फुल बॉडी वर्कआऊट आहे. ज्यामुळे मसल्स मजबूत होतात, फिटनेस वाढतो आणि शरीराची ताकदही वाढते. स्वीमिंगमुळे वजन आटोक्यात राहण्यासही मदत होते.
  3. – स्विमिंगमुळे तुमच्या सांध्यांवर ताण पडत नाही, त्यामुळे ज्या व्यक्ती गुडघेदुखीच्या त्रासाने त्रस्त असतील, तेही आरामात स्विमिंग करून फिट राहू शकतात. शारीरिकदृष्ट्या कमी सक्षम असलेल्या व्यक्तींनाही सहज स्विमिंग करता येऊ शकते.
  4. – स्विमिंगमुळे फुप्फुसांची ताकद वाढते. ज्या व्यक्तींना अस्थमाचा त्रास आहे, त्यांनाही स्विमिंगमुळे आराम मिळू शकतो. स्विमिंग केल्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते आणि इन्सुलिन सेंसिटिव्हिटीही वाढते, असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
  5. – स्विमिंगमुळे चांगली, शांत झोप लागण्यास मदत होते. स्विमिंग केल्यामुळे बऱ्याच कॅलरीही जळतात, जे वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. प्रेग्नन्सीदरम्यानही स्विमिंग करणे सुरक्षित समजले जाते. मात्र हे प्रत्येक महिलेच्या तब्येतीवर अवलंबून असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तुम्ही स्विमिंग करू शकता.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.