AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monkeypox virus | युरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग वाढला, WHO ने घेतली महत्वाची बैठक!

मंकीपॉक्स संदर्भात क्लुगे म्हणाले की, हा संसर्ग असामान्य दिसत होता. विशेष म्हणजे ज्याठिकाणी मंकीपॉक्सच्या केसेस आढळल्या आहेत, त्यालोकांनी कुठेही प्रवास वगैरे केला नाहीये. मात्र, असे असताना देखील त्या लोकांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. धोक्याची घंटा म्हणजे युरोपमध्ये 100 प्रकरणे यासंदर्भातील आढळली आहेत.

Monkeypox virus | युरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग वाढला, WHO ने घेतली महत्वाची बैठक!
| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 3:50 PM
Share

मुंबई : मंकीपॉक्स (Monkeypox) या विषाणूने युरोपीय देशामध्ये पाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. यामुळे ही एक धोक्याची घंटा आहे. जर्मनी, बेल्जियम, इटली, नेदरलँड, स्पेन, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये मंकीपॉक्सच्या केसेसची नोंद झाली आहे. मंकीपॉक्स या विषाणूचा कहर बघता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपत्कालीन बैठक बोलावली होती. मंकीपॉक्स या विषाणूच्या (Virus) संदर्भात एका अधिकाऱ्यांने माहिती देताना सांगितले की, सध्या उन्ह जास्त आहे. वेगवेगळ्या पार्ट्या, उत्सव, लग्न यामुळे गर्दीमध्ये वाढ होत आहे. यामुळेच मंकीपॉक्सचा प्रसार वाढतो आहे. यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे.

स्पेनमध्ये 24 नवीन केसेस आढळल्या

मंकीपॉक्स संदर्भात क्लुगे म्हणाले की, हा संसर्ग असामान्य दिसतो आहे. विशेष म्हणजे ज्याठिकाणी मंकीपॉक्सच्या केसेस आढळल्या आहेत, त्यालोकांनी कुठेही प्रवास वगैरे केला नाहीये. मात्र, असे असताना देखील त्या लोकांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. धोक्याची घंटा म्हणजे युरोपमध्ये 100 प्रकरणे यासंदर्भातील आढळली आहेत. तर इकडे स्पेनमध्ये 24 नवीन केसेस आढळल्या आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सने जर्मनीच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसने म्हटले आहे की, युरोपमधील मंकीपॉक्स हा सर्वात मोठा आणि वेगाने पसरणारा संसर्ग आहे.

अंगावर लाल पुरळ येण्याची समस्या

मंकीपॉक्सचा संसर्ग संपर्कात असलेल्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो. मंकीपॉक्सचा धोका असलेल्या व्यक्तीने वापरलेले कपडे वापरल्याने देखील संसर्ग होण्याची शक्यता असते. मंकीपॉक्समध्ये व्यक्तीच्या अंगावर लाल पुरळ येते. ब्रिटनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने सांगितले की मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ संसर्ग आहे. जो लोकांमध्ये सहज पसरत नाही आणि त्याची लक्षणे देखील सौम्य असतात. मंकीपॉक्स हा एका आठवड्यामध्ये बरा होणारा आजार आहे. मात्र, काही केसेसमध्ये धोका देखील अधिक असतो.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.