AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss Food: झपाट्याने वजन कमी करण्यासाठी हे 5 पदार्थ ठरतात उपयुक्त, हिवाळ्यात आवर्जून करा सेवन

काही पदार्थ असे असतात ज्यांचे नियमित सेवन केल्याने वजन कमी करता येऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? त्याबद्दल जाणून घेऊया.

Weight Loss Food: झपाट्याने वजन कमी करण्यासाठी हे 5 पदार्थ ठरतात उपयुक्त, हिवाळ्यात आवर्जून करा सेवन
| Updated on: Nov 17, 2022 | 4:07 PM
Share

नवी दिल्ली – एखादी व्यक्ती जाड किंवा लठ्ठ (weight gain) कोणत्या कारणामुळे होते हे समजणं इतक सोप नाही. वजन वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. अनियमित जीवनशैली (bad lifestyle), पोषक आहाराचा अभाव, धूम्रपानाची सवय, थायरॉइडसारखे आजार, मधुमेह, अनुवंशिकता किंवा खराब चयापचय अशी अनेक कारणं वजन वाढण्यामागे असतात. नियमित व्यायाम करणे , केवळ ही एकच गोष्ट वजन कमी करण्यासाठी पुरेशी ठरत नाही. त्यासाठी आहाराकडे लक्ष देणेही गरजेचे असते. यासाठी तुम्हाला एक चांगला डाएट प्लॅन तयार करून त्याचे नियमित पालन करावे लागेल. काही पदार्थ असे असतात ज्यांचे नियमित सेवन केल्याने वजन कमी (Weight Loss Food)करता येऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? त्याबद्दल जाणून घेऊया.

पनीर खाल्याने वजन होते कमी पनीरमध्ये प्रोटीन्स मुबलक प्रमाणात असतात. त्याचे सेवन केल्याने तुम्हाला बराच वेळ शकत नाही. प्रत्येक 100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 335 कॅलरीज आढळतात. पनीरमध्ये कॅल्शिअमदेखील असते, जे हाडांसाठी देखील सर्वोत्तम अन्न ठरते.

अंडेही ठरते उपयोगी

अंड्यांमध्येही भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. तसेच निरोगी शरीरासाठी आवश्यक असणारी व्हिटॅमिन्सही अंड्यांमध्ये असतात. नाश्त्यासाठी अंडी खाणं उत्तम. ती खाल्याने पोट भरलेले राहते व बराच वेळ भूकही लागत नाही. त्यामुळे जास्त कॅलरी सेवन करण्यापासूनही बचत होते, ज्यामुळे वजनही नियंत्रणात राहतं.

मूग डाळ

मुगाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वजन कमी करायचे असेल तर मूग डाळीचे सेवन अवश्य करावे. मोड आलेली मूग डाळ सलॅडमध्ये मिसळून खाल्ल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता. एक कप मोड आलेल्या मूग डाळीमध्ये सुमारे 26 कॅलरी असतात.

संत्रं संत्री खाल्ल्यानेही वजन नियंत्रणात राहते हे तुम्हाला माहीत आहे का ? हिवाळ्याच्या दिवसात हंगामात संत्री तशीही भरपूर मिळतात. वजन कमी करायचं असेल तर रोज संत्री खावीत. फायबरयुक्त आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेल्या अशा संत्र्यामध्ये फारशा कॅलरीजही नसतात. तुम्ही संत्र सोलून खा किंवा त्याचा रस प्या, तुमचे वजन वाढणार नाही.

हळद वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हळद उपयुक्त असते, हे तुम्हाला माहीत आहे का ? भारतीय स्वयंपाक घरातील एक महत्वपूर्ण मसाला असलेल्या हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो. ते शरीरात असलेल्या ऊतींमधून चरबी कमी करते. यामुळेही वजन कमी होऊ शकते. एक चमचा हळदीमध्ये जवळपास 8 कॅलरीज असतात.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.