AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पटापट, झटपट खायची सवय आहे का? तोटे वाचा

उतावीळ पणा केल्याने तुमचे वजन तर वाढतेच, शिवाय मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. अशावेळी जर तुम्हालाही पटापट जेवायची, काही खायची सवय असेल तर सावध व्हा. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पटापट अन्न खाल्ल्याने आरोग्याला काय हानी पोहोचते...

पटापट, झटपट खायची सवय आहे का? तोटे वाचा
eating fast disadvantagesImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 20, 2023 | 1:38 PM
Share

मुंबई: अन्न हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्हाला माहित आहे का की वेगाने खाल्ल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. उतावीळ पणा केल्याने तुमचे वजन तर वाढतेच, शिवाय मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. अशावेळी जर तुम्हालाही पटापट जेवायची, काही खायची सवय असेल तर सावध व्हा. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पटापट अन्न खाल्ल्याने आरोग्याला काय हानी पोहोचते…

झटपट अन्न खाण्याचे तोटे

  1. खाण्याच्या घाईत आपण बहुतेक वेळा नीट न चघळता अन्न गिळतो. यामुळे आपल्या पचनसंस्थेला अन्न नीट पचविणे अवघड होते. यामुळे आपले पोट वाढते आणि आपल्याला वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.
  2. फास्ट खाल्ल्याने आपल्या शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही, जो अन्न पचवण्यासाठी आणि त्यावर योग्य प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो.
  3. खाण्याच्या घाईमुळे शरीराच्या भूकेच्या संवेदनांवरही परिणाम होतो. जेव्हा आपण वेगाने खातो तेव्हा आपल्या मेंदूला ‘पोट भरले आहे’ असा सिग्नल मिळण्यास वेळ लागतो. यामुळे आपण सर्वाधिक खातो, ज्यामुळे वजन वाढते.
  4. अन्नाकडे पाहण्याचा आपला विचार बदलायला हवा. अन्न हे केवळ भूक मिटविण्याचे साधन नसून ते आपल्या शरीरासाठी उर्जेचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. अन्न चावून खाल्ले पाहिजे आणि त्याचा आनंद घ्यावा.
  5. हे लक्षात घेऊन आपण आपल्या खाण्याचा वेग कमी केला पाहिजे. यामुळे आपली पचनक्रिया सुधारेल, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल आणि मधुमेहासारखे आजार टाळण्यास मदत होईल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर.
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट.
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?.
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,.
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे.....
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे......
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या...
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या....
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...