AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exercise Benefits: सकाळी ‘हे’ योगासन केल्यास तुमचं शरीर राहिल निरोगी…

Streching Exercise: सकाळी उठल्यावर व्यायाम करावासा वाटत नाही का? जर होय तर तुम्ही हे व्यायाम बेडवरच करू शकता तुम्हाला बेडवरून उठण्याचीही गरज नाही. तुम्ही बेडवर झोपून स्ट्रेचिंग करू शकता यामुळे तुमचे शरीर ताणले जाईल. तसेच, हे तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करेल.

Exercise Benefits: सकाळी 'हे' योगासन केल्यास तुमचं शरीर राहिल निरोगी...
| Edited By: | Updated on: Jan 27, 2025 | 6:46 PM
Share

निरोगी आरोग्यसाठी पोषक आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरामधील हार्मोन्स संतुलित राहाणायास मदत होते. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या शरीरामधील कोलेस्ट्रॉल वाढते. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे लठ्ठपणासारख्या समस्या उद्भवतात. शरीरातील लठ्ठपणा वाढल्यामुळे तु्म्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वजन वाढणे यांच्या सारख्या समस्या होतात. सकाळी काही नियमित व्यायाम केल्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहाण्यास मदत होते.

दररोज सकाळी मॉर्निंग स्ट्रेचिंग केल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. तुम्ही सकाळी अंथरूणातून उठल्याशिवाय काही सोपे व्यायम करू शकता ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होईल. हे व्यायाम तुमच्या शरीराला लवचिक बनवते त्यासोबतच तुमच्या शरीरामध्ये दिवसभर उर्जा निर्माण करण्यास मदत होते. योगा केल्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाता आणि फ्रेश दिसता.

रात्रभर झोपल्यामुळे तुमच्या शरीरातील स्नायू अकडून जातात. सकाळी उठल्यावर स्ट्रेचिंग केल्यामुळे तुमच्या शरीरातील जडपणा दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमचे आकडकलेले स्नायूंना आराम मिळतो. स्ट्रेचिंग केल्यामुळे शरिरातील रक्तभिसरण संपूर्ण शरीरामध्ये सुरळीत होते ज्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांना नियमित ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. सकाळी लवकर उठून स्ट्रेचिंग केल्यामुळे तुमच्या शरीराच एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते. सकाळी नियमित स्ट्रेचिंग केल्यामुळे तुमच्या शरीरातील लवचिकता वाढते आणि तुमचा मानसिक तणाव दूरर होण्यास मदत होतो. व्यस्त जीवनशैलीमुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात मानसिक तणाव येतो ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. नियमित व्यायाम केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्या मदत होते.

साईड स्ट्रेच : –

तुमच्या डाव्या बाजूला एक साईड होऊन झोपा. त्यानंतर तुमचा उजवा हात तुमच्या डोक्यावर ठेवा आणि डाव्या बाजूला ठेवा. काही वेळ या पोझमध्ये राहा यामुळे तुमच्या शरीराला स्ट्रेचिंग मिळते आणि तुमच्या शरीरातील अकडलेले स्नायू मोकळे होतात.

ब्रिज पोझ :-

तुमच्या पाठीवर झोपा. त्यानंतर पाय गुडघ्यांमधून वाकून तुमच्या कंबरेच्या हाईटनुसार पाय उचला. त्यानंतर तुमची कंबर उचला आणि ब्रिज पोझ ट्राय करा. हा योगासन केल्यास तुमच्या खांड्याच्या स्नायू मोकळ्या होतात आणि तुम्हाला जर कंबर दुखीची समस्या असेल तर ती समस्या दूर होण्यास मदत होईल.

कॅट काऊ पोझ :-

तुमचे गुडघे आणि हात जमिनीवर ठेऊन तुमचं शरीर उचला आणि त्यानंतर तुमची कंबर झाली जमिनीच्या दिशेनी वाकवा. या आसनाला मार्जरासन असे म्हणतात. मार्जरासन केल्यामुळे तुमच्या कंबरेमधील समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच संपूर्ण शरीरातील स्नायू मोकळे होण्यास मदत होते.

व्यायाम करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

स्ट्रेचिंग करताना हळू हळू करा आणि काही दुखत असल्यास लगेच थांबवा.

प्रत्येक व्यायाम 3-5 वेळा पुन्हा करा.

स्ट्रेचिंग करण्यापूर्वी थोडे वॉर्म-अप करणे फायदेशीर ठरते.

जर तुम्हाला आरोग्याची कोणतीही समस्या असेल तर व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.