‘हे’ आहे बाप बनण्याचे योग्य वय… त्यानंतर पुरुषांना आरोग्याच्या अनेक समस्यांचा करावा लागतो सामना; वाढत्या वयाबरोबरच वंध्यत्वाचाही धोका!

पुरुषांमध्ये दररोज विर्याची निर्मिती होते, परंतु वाढत्या वयानुसार शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी-कमी होऊ लागते. अशा परीस्थीतीत वडील होण्याचे सर्वोत्तम वय कोणते, कोणत्या वयानंतर वडील बनण्याचा तुमच्यावर आणि मुलाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही, तसेच निरोगी अपत्य प्राप्तीचा मार्ग कोणता याबाबत आपल्याला माहिती हवी.

‘हे’ आहे बाप बनण्याचे योग्य वय... त्यानंतर पुरुषांना आरोग्याच्या अनेक समस्यांचा करावा लागतो सामना; वाढत्या वयाबरोबरच वंध्यत्वाचाही धोका!
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 7:42 PM

मुंबईः बहुतेकदा असे मानले जाते की स्त्रियांना मुले होण्यासाठी योग्य वयासह मर्यादा (Limits with appropriate age) असतात तर पुरुषांना कोणत्याही वयात मुले होऊ शकतात.मात्र, हे पूर्णपणे असत्य आहे. मुले होण्याच्या बाबतीत स्रीयांच्या वया इतकेच पुरुषांचे वय महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या (The number of sperm) आणि त्याची गुणवत्तेचे प्रमाण कमी होऊ लागते. तज्ज्ञांच्या मते, 20 ते 30 वर्षे हे वय पुरुषांसाठी वडील होण्यासाठी (To be a father to men) योग्य आहे. दरम्यान, काही प्रकरणात, पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुले होऊ शकतात.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, एका व्यक्तीने वयाच्या 92 व्या वर्षी मुलाला जन्म दिला. संशोधकांचे म्हणणे आहे की, मुलाला जन्म देण्यासाठी पुरुषांचे वय खूप महत्वाचे आहे. वयाच्या 40 वर्षांनंतर पुरुषांमध्ये बाप होण्याची शक्यता कमी होऊ लागते.

शुक्राणूंच्या डीएनएचे नुकसान

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुरुषांमधील शुक्राणूंचे उत्पादन कधीच थांबत नाही, परंतु वयानुसार, शुक्राणूंच्या डीएनएचे नुकसान होण्याची शक्यता लक्षणीय वाढते, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. न जन्मलेल्या मुलाच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. अनेक अभ्यासांमध्ये हे उघड झाले आहे की जेव्हा पुरुष मोठ्या वयात पिता होतो, तेव्हा मुलांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटल विकार होऊ शकतात. वर्ष-2010 च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की 40 वर्षांच्या वयानंतर वडील बनलेल्या पुरुषांना त्यांच्या मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम विकसित होण्याचा धोका पाचपट आहे.

कोणत्या वयानंतर शुक्राणूंची निर्मिती थांबते

जागतीक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने) पुरुषांच्या वीर्यासाठी काही निकष ठरवले आहेत. ज्यावरून निरोगी शुक्राणू ठरवले जातात. यामध्ये शुक्राणूंची संख्या, आकार आणि हालचाल समाविष्ट आहे. त्यानुसार, वयाच्या 35 व्या वर्षी पोहोचताच पुरुषांमध्ये शुक्राणूंचे हे पॅरामीटर खराब होऊ लागते.

या काळात पुरुष अधीक प्रजननक्षम-

22 ते 25 वयोगटातील पुरुष सर्वाधिक प्रजननक्षम असतात. अशा परिस्थितीत, त्यांना 35 वर्षांच्या आधी मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला जातो. कारण, या वयानंतर प्रजनन क्षमता बिघडू लागते. जर तुम्ही वयाच्या ४५ वर्षांनंतर मूल होऊ देण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधा.

तर, पिता होणे धोकादायक:-

जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिटी हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की वयाच्या 25 वर्षापूर्वी वडील बनल्याने पुरुषांना आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. असे अनेक प्रकणात घडते कारण बहुतेक पुरुष लहान वयात वडील होण्यासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार नसतात. परंतु, नंतर त्याचा फटका त्यांना सहन करावा लागतो.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.