AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Teeth : मोत्यासारखे चमकू लागतील पिवळे पडलेले दात, करा हे 3 घरगुती उपाय!

र्थ आपल्या दातांवर परिणाम करतात. त्याचबरोबर योग्य ब्रश न केल्याने न केल्याने आपल्या दातांवर जिवाणू जमा होऊ लागतात. काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी पिवळेपणापासून मुक्तता मिळवू शकता.

Teeth : मोत्यासारखे चमकू लागतील पिवळे पडलेले दात, करा हे 3 घरगुती उपाय!
Yellow teeth
| Updated on: Jun 16, 2023 | 11:00 PM
Share

मुंबई : प्रत्येकजण बाहेरचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. कोल्ड्रिंक्स, चॉकलेट्स, फास्टफूड अशा अनेक पदार्थांचा आस्वाद लोक आवर्जून घेतातच. पण हेच पदार्थ आपल्या दातांवर परिणाम करतात. त्याचबरोबर योग्य ब्रश न केल्याने न केल्याने आपल्या दातांवर जिवाणू जमा होऊ लागतात. यालाच प्लेक असे म्हणतात जे कालांतराने टार्टरमध्ये बदलते.

प्लेक जेव्हा घट्ट होतो तेव्हा टार्टर तयार होतो. प्लेक किंवा टार्टर जमा झाल्यामुळे हिरड्याचा रोग होतो. हिरड्यांना आलेली सूज पीरियडॉन्टायटीस होऊ शकते जी एक गंभीर संसर्ग आहे. या संसर्गामुळे दातांचे संरक्षण करणारी हाडं असतात ती ढासळतात.

जेव्हा आपले दात हे पिवळे होतात तेव्हा ते दिसायला खूप वाईट दिसतात. तसंच पिवळे दात हे तोंडाच्या आरोग्यासाठीही घातक ठरतात. तर या समस्येवर आपल्याला घरगुती उपचार करता येतात. काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी टार्टरपासून मुक्तता मिळवू शकता.

पेरू या फळाची पाने दातांसाठी खूप फायदेशीर आहेत. पेरूची पाने ही नैसर्गिकरित्या प्लेक आणि टार्टर काढून टाकण्यास मदत करतात. एवढेच नाही तर ही पेरूची पाने हिरड्यांची जळजळ देखील कमी करण्यास मदत करते. तर तुम्हाला दररोज काही पेरूची पाने स्वच्छ धुवून ती तोंडात चघळायची आणि थुंकायची आहेत. त्यामुळे दातांवर प्लेक तयार होण्याचा धोका कमी होतो. तसंच कच्चा पेरू मीठ लावून खा यामुळे दातांवर जमा झालेले टार्टर स्वच्छ होते.

व्हिनेगरही प्लेक आणि टार्टर काढून टाकण्यास मदत करतो. कारण व्हिनेगरमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो. त्यामुळे दररोज व्हिनेगरचे द्रावण तयार करा आणि माउथवॉश म्हणून त्याचा वापर करा. त्यासाठी ​​अर्धा कप पाणी घ्या, त्यात 2 चमचे पांढरे व्हिनेगर आणि अर्धा चमचे मीठ घाला. हे सर्व मिश्रण मिक्स करा, मग तुमचे व्हिनेगर द्रावण तयार. या द्रावणाने दररोज माउथवॉश करा.

कोरफड ही दातांसाठी खूप फायदेशीर असते. जरी ती चवीला कडू असली तरी ती दातांवरील टार्टार काढून टाकण्यासाठी मदत करते. यासाठी एक चमचा कोरफडीचा गर, चार चमचे ग्लिसरीन, पाच चमचे बेकिंग सोडा, लिंबाचे आवश्यक तेल आणि एक कप पाणी घ्या. हे सर्व नीट मिक्स करा. त्यानंतर या तयार झालेल्या पेस्टने नीट दात घासून घ्या. याचा तुमच्या दातांसाठी नक्कीच फायदा होईल.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.