AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाडात जमलेले युरिक एसिड असे बाहेर काढा, हे 4 उपाय नक्की आजमावा

आता तरुणांनाही युरिक एसिडचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे कमी वयात हाडे आणि संधीवाताचे दुखणे सुरु होत आहे. या त्रासाला दूर करण्यासाठी आता काही पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

हाडात जमलेले युरिक एसिड असे बाहेर काढा, हे 4 उपाय नक्की आजमावा
uric acid
| Updated on: Jul 25, 2025 | 7:59 PM
Share

आजकाल चुकीचा आहार आणि वाईट लाईफस्टाईलने युरिक एसिडच्या समस्या वेगाने वाढत आहे. वाढत्या वयानुसार युरिक एसिडची समस्या सर्वसामान्य मानली जाते. परंतू आता तरुणांनाही युरिक एसिडची पातळी वाढल्याने सांधेदुखी सुरु झाली आहे.याला जबाबदार राहणीमान, अयोग्य आहार आणि बैठे कामाने व्यायामाचा अभाव. शरीरात एकदा का युरिक एसिड वाढले की सांध्यात दुखणे, संधीवात होणे अशा समस्या होतात. यास वेळीच कंट्रोल केले नाही तर किडनी डिसिज आणि डायबिटीजचा धोका वाढतो.

युरिक एसिड शरीरात होणारे टॉक्सिन आहे. टॉक्सिन आपल्या सर्वांच्या शहरात बनते.  किडनी  काम करीत या टॉक्सिनना युरिनच्या माध्यमातून शरीराच्या बाहर टाकत असते. युरिक एसिड बनने एक नॅचरल प्रोसेस आहे. कारण हे प्युरिन वाढल्याने बनते. प्युरिन एक असे रसायन आहे, ते शरीरात नैसर्गिक रुपाने आढळते आणि काही पदार्थांतही ते असते. शरीरात युरिक एसिड असल्याने शरीराला धोका तयार होतो. हाय युरिक एसिड संधीवाताला निमंत्रण होते. त्याने अन्य समस्यांना निमंत्रण मिळते. आयुर्वेद आणि युनानी उपचार तज्ज्ञांनी काही पदार्थ सांगितले आहेत. ज्याने हाडात जमलेले युरिक एसिड बाहेर पडण्यात मदत होते.

काकडी –

युरिक एसिड समस्या असेल तर काकडी एक हलके, पाणीदार आणि कमी प्युरिन असणारे फळ आहे. त्यात ९५ टक्के पाणी असते. जे शरीरातील अतिरिक्त विषाक्त पदार्थांना म्हणजे टॉक्सिन, घाण आणि युरिक एसिडला लघवीवाटे बाहेर काढण्यात मदत करते. काकडी नुसती खाल्ली तर उत्तम किंवा त्याचा ज्युस बनवून पिणेही फायदेमंद होते.

जव किंवा बारली वॉटर

आयुर्वेदात जवला एक शरीराला साफ करणारे आणि अनेक आजारांना आमंत्रण देणारे टॉनिक मानले जाते. याची तत्व शरीरातील एक्स्ट्रा युरिक एसिडला लघवी वाटे बाहेर काढण्यास मदत करते. जर तुम्हाला संधीवात, सांधे सुज किंवा दुखत असेल तर रोज बारली वॉटर पिण्यास सुरु करावे. या शिवाय दलिया खाणे ही फायद्याचे असते. याच्या नियमित सेवनाने किडनी योग्य प्रकारे काम करते आणि शरीर डिटॉक्स होते.

विटामिन सी असलेली फळे –

यूरिक एसिडच्या पातळी कमी करण्यासाठी विटामिसी सी खूप महत्वाचे आहे. आवळा, संत्री, लिंबू आणि पेरु सारखे फळांमध्ये विटामिन सी भरपूर असते. हे एंटीऑक्सिडेंट शरीरात जमलेले अतिरिक्त युरिक एसिडला लघवीच्या वाटे बाहेर पडण्यास मदत करते. या फळांना रोज खाल्ल्याने केवळ युरिक एसिड कमी होत नाही तर रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

योग्य प्रमाणात पाणी पिणे –

जर शरीरात यूरिक एसिड वाढत असेल तर त्याला नैसर्गिकरित्या बाहेर काढण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे पाणी पिणे. रोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायल्याने किडनी सक्रीय राहते. युरिक एसिड लघवी वाटे शरीराच्या बाहेर सहज पडते. साधे पाणी किंवा लिंबू पाणी साखर न टाकता पिऊ शकता. कारण हे शरीरात क्षारयुक्त वातावरण बनवतात.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.