AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : तुम्हीही कॉटन बड्सने कान साफ करता का ? जाणून घ्या दुष्परिणाम

कॉटन बड्सनी कान साफ करताना आतील मळ किंवा घाण आतमध्ये जाऊन कानाच्या पडद्याला दुखापत होऊ शकते. तसेच हानिकारक बॅक्टेरियाही कानात जाण्याचा धोका असतो.

Health Tips : तुम्हीही कॉटन बड्सने कान साफ करता का ? जाणून घ्या दुष्परिणाम
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 27, 2023 | 1:48 PM
Share

Cotton birds and ear infection : पाणी, हवा, धूळ किंवा माती यामुळे कानात घाण जमा होऊ लागते. यालाचा ईअर वॅक्स किंवा कानातील मळ (earwax) म्हणतात. तो काढण्यासाठी, कान साफ करण्यासाठी लोकं कॉटन बड्सचा (cotton buds) उपयोग करतात. शहरी भागांत कॉटन बड्स वापर करण्याचे प्रमाण जास्त आहे. पण त्याने कान (cleaning ear) साफ करणं योग्य असतं का ? त्याच्या वापराने कान खरंच साफ होतात की कानांचे नुकसान होते ? चला जाणून घेऊया..

डॉक्टर काय सांगतात ?

कान स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्सचा वापर करणे योग्य नसते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जेव्हा आपण कॉटन बड्स कानात टाकतो, तेव्हा कानातील घाण बाहेर काढण्याऐवजी ती आणखी आत ढकलली जाते. त्यामुळे कानात इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. यामुळे कानाला त्रास होऊ शकतो, तसेच कॉटन बड्समुळे कानाच्या पडद्याचेही नुकसान होऊ शकते. यामुळे ऐकू येण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. तसेच कानात रॅशेसही होऊ शकतात.

कानाच्या आत जाते घाण

कानात मळ किंवा ईअरवॅक्स तयार होण्याची प्रक्रिया असते, असे डॉक्टर सांगतात. हे इअरवॅक्स कानांचे संरक्षण करते, पण ते जास्त प्रमाणात बनले तर त्यामुळे नुकसानही होऊ शकते. लोकं कॉटन बड्सने कान स्वच्छ करतात, पण साफसफाई करताना घाण कानाच्या आणखी आत जाऊ शकते. तसेच या मळासोबत इतर धोकादायक बॅक्टेरियाही कानात जाण्याचाही धोका असतो.

या बॅक्टेरियामुळे कानाच्या पडद्याचेही नुकसान होऊ शकते. कानाच्या आत काही घाण किंवा बॅक्टेरिया गेल्यास ते सहज कळत नाही. काही वेळा कानाला खाज सुटते, पण लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे कानातील घाण, मळ वाढू लागते, ज्यामुळे कानाचे आणखी गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळेच कॉटन बड्स वापरणे टाळावे. विशेषत: लहान मुलं आणि वृद्धांनी त्याचा वापर न करणे चांगले ठरते.

आपोआप निघतो कानाचा मळ

आपल्या शरीराची स्वतःला स्वच्छ करण्याची प्रक्रिया असते. तसेच कान देखील स्वतःला स्वच्छ करतात. कधी कधी कानातून घाण बाहेर येते आणि मळही निघतो. त्यामुळे रोजच्या रोज कान साफ केलाच पाहिजे असं नाही.

कानाची सफाई कशी करावी ?

कान स्वच्छ करण्याचा उत्तम उपाय म्हणजे कानात तेल घालणे. कानात तेल घातल्याने आतील घाण किंवा मळ मऊ होतो आणि बाहेर येतो. हा मळ तुम्ही कापडाच्या मदतीने सहज काढू शकता. तसेच आंघोळ करताना कान स्वच्छ करणे आवश्यक आहे. कारण आंघोळ करताना थोडेसे पाणी कानात जाऊ शकते. ते साफ करावे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल