AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज केवळ 20 मिनिटे चालल्याने कमी होईल 10 किलो वजन, कसे ते तज्ज्ञांकडून जाणून घ्या

Walking For Weight Loss : आपल्याला अनेकदा वाटते की वजन कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जिममध्ये घाम गाळणे किंवा जास्त व्यायाम करणे. परंतू चालण्यासारख्या साध्या व्यायामातूनही चमत्कार होऊ शकतो.

रोज केवळ 20 मिनिटे चालल्याने कमी होईल 10 किलो वजन, कसे ते तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Walking For Weight Loss
| Updated on: Dec 28, 2025 | 5:20 PM
Share

वजन कमी करण्याकडे बहुतेकांचा कल आहे. त्यामुळे अनेकजण जिममध्ये घाम गाळत असतात. परंतू कठोर एक्सरसाईज न करता देखील वजन कमी करता येते. चालण्याने देखील तुमचे वजन कमी होऊ शकते. केवळ ते योग्यप्रकारे करायला हवेत. अनेक लोक एक्सरसाईज करायला कंटाळा करतात. परंतू वाढत्या वजनाने ते चिंताग्रस्त असतात. वेगाने वजन कमी करु इच्छीतात. परंतू तुमच्यासाठी एक नॉमर्ल वॉक देखील कमाल करु शकतो. परंतू तो नियमित करावा लागेल. आणि पेशन्सही बाळगावा लागेल. एका प्राध्यापकाने वॉकिंगपासून रिझल्ट मिळवण्याचे 5 सोपे उपाय पाहूयात..

वॉकिंग केवळ कॅलरी बर्न करत नाही तर तुमच्या मेटाबॉलिझ्मला देखील बूस्ट करते. आणि डायझेशनला ( पचन )  रुळांवर आणते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चालणे कोणत्याही वयाचा मनुष्य करु शकतो. त्यात सांधेदुखीचा धोकाही कमी असतो. जर तुम्ही तुमच्या वॉकमध्ये थोडा बदल केला तर कोणत्याही कठोर डाएट शिवाय देखील वजन कमी करु शकता. चला तर वजन कमी करण्यासाठी पायी चालणे किंवा वॉकिंग कसे मदत करु शकते.

वजन कमी करण्यास चालणे कसे कामी येते ?

जेव्हा शरीर घेतलेल्या कॅलरीपेक्षा जास्त खर्च करु लागते तेव्हा वजन घटू लागते. रोज फिरल्याने शरीरात जमलेली फॅट एनर्जीच्या रुपात वापरली जाते. यामुळे शरीराला हळूहळू शेप येऊ लागतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वेगाने वजन कमी करण्याचे 5 सोपे उपाय :

जेवल्यानंतर लागलीच फिरा : जेवल्यानंतर 10 ते 20 मिनिटांची हलकी वॉकींग केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहाते आणि जेवण पचण्यास मदत होते. दिवसातून तीन वेळा गॅपने चालणे हे एकाच वेळी दीर्घकाळ वॉक पेक्षा चांगले असते.

चालताना वेग आणा (Power Walking) : केवळ फिरु नका, तर चालताना थोडे वेगाने चाला. वेगाने चालण्याने हार्ट रेट वाढतो. आणि गुडघ्यावर कमी दबाव येतो. यास पॉवर वॉकिंग म्हणतात, ज्यामुळे कॅलरी वेगाने बर्न होत असते.

चालताना पायऱ्यांचा वापर करा : सपाट जमीनीवर चालण्याच्या ऐवजी पायऱ्याचा वापर करा. त्यामुळे तुमच्या मांडी आणि पोटाच्या स्नायूंवर जोर पडतो. ज्यामुळे जास्त मेहनत लागते आणि चरबी लवकर वितळते.

वेग बदलत राहा (Interval Walking) : एक मिनिटात खूप वेगाने चाला. आणि नंतर दुसऱ्या मिनिटांना तुमचा वेग धीमा करा. याप्रकारे वारंवार वेग बदलल्याने फॅट बर्निंग प्रोसेस वेगाने होते.

थोडे वजन सोबत बाळगा : वॉक करताना पाठीवर बॅग ( Backpack ) लटकवा, किंवा हलके वजन कॅरी करा. त्यामुळे शरीराला जास्त मेहनत करावी लागते. त्याचा परिणाम असा की कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होते.

युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.